Categories: Uncategorized

जिल्हा रूग्णालय औंध पुणे वतीने दि १२/३/२०२३ ते १८/३/२०२३ अखेर जागतिक काचबिंदू सप्ताहाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मार्च) :  जिल्हा रूग्णालय औंध पुणे वतीने दि १२/३/२०२३ ते १८/३/२०२३ अखेर जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करणेत येणार आहे या वर्षाचे घोषवाक्य “Let’s Beat Invisible Glaucoma “ आहे. सदर सप्ताह कार्यक्रमाचे ऊद्घाटन मा. अति जिल्हा शल्यचिकित्सक डॅा वर्षा डोईफोडे यांचे हस्ते जिल्हा रूग्णालय येथे करणेत आले.

सदर प्रसंगी रुग्णालयीन अधिकारी कर्मचारी रूग्ण ऊपस्थित होते. प्रास्ताविक करताना डॅा प्रकाश रोकडे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक यांनी काचबिंदू आजाराची माहिती दिली यात भारतातील एकुण १३४ लक्ष अंध व्यक्ति पैकी काचबिंदू चे प्रलचन हे ५.५% ईतके आढळून येते. काचबिंदू हा अदृष्य दृष्टी चोर म्हणून ओळखला जातो , कारण सुरूवातीस काहीही लक्षणे आढळून येत नाहीत, रोगनिदान होईपर्यंत बाह्य दृष्टी कमी झालेली असते आणि ती पुर्वव्रत करता येत नाही. वेळेत ऊपचार घेतला नाही तर दृष्टी हळू हळू कमी होवून डोळ्याचे मागील नसेवर परिणाम होवून व्यक्तिला पुर्ण अंधत्व येते.

काचबिंदू लक्षणे दृष्टी धुसर कमी होते, पेटत्या बल्ब कडे पाहिले तर रंगीत गोलाकार वलय दिसतात, जवळचा चष्मा सतत बदलला लागतो,डोके व डोळे दुखणे, ऊलटी मळमळ होणे ई. काचबिंदू चे निदान डोळ्यावरील ताण तपासणे,optical coherence tomography, perimetry ई तपासण्या द्वारे करणेत येते, काचबिंदू ऊपचार औषधी थेंब , लेझर शस्त्रक्रिय व ईतर शस्त्रक्रिया करून केला जातो प्रतिबंधात्मक ऊपाय -सक्रिय जिवनशैली , सकस आहार ,धुम्रपान टाळणे , वजन नियंत्रित ठेवणे. मधमेह ,ऊच्च रक्तदाब, व चाळीस वयोगटावरील सर्वांनी किमान ६ महिन्यातून एकदा नेततज्ञ कडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.सदर प्रंसगी डॅा वर्षा डोईफोडे यांनी जिल्हा रूग्णालयात काचबिंदू ओपीडी दर सोमवारी सकाळी ११ ते १ सुरू करणेत आले बाबतची घोषणा केली.आज सुमारे ७५ रूग्णाची तपासणी करणेत आली व काचबिंदू पमाहिती पत्रक वाटले आहे .डॅा सचिन धस नेत्रशल्यचिकित्सक यांनी आभार मानले.

मा डॅा नागनाथ यमपल्ले जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मागदर्शाखाली डॅा प्रकाश रोकडे जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक नेत्र विभागातील सर्व नेत्र चिकित्सा अधिकारी /कर्मचारी यांनी जिल्हा रूग्णालय व जिल्हातील ऊपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय येथे डॅा राहुल देशपांडे मुख्य वैद्यकिय संचालक पुणे अंधजन मंडळ महमदवाडी यांचे सहकार्याने कांचबिंदू सप्ताह चे नियोजन केले आहे. सर्व जनतेला काचबिंदू निदान व ऊपचार मोफत देणेत येणार आहे तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान डॅा नागनाथ यमपल्ले यांनी केले आहे कृपया सदर काचबिंदू सप्ताह ची आपले दैनिकांत प्रसिद्धी देणेत यावी ही विनंती.

अधिक माहिती करीता संपर्क :- डॅा प्रकाश रोकडे ९९२२५०१२६८

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 week ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

3 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago