Categories: Editor ChoicePune

Pune : पुन्हा एकदा अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन कोलमडणार ?

महाराष्ट्र 14 न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी कर्मचार्यांनी गुरुवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे . उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी सोमवारी झालेल्या चर्चेतूनदेखील कोणतेही लेखी आश्वासन समितीला मिळाले नाही . त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासोबत राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यापीठ बंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचार्यांनी घेतला आहे .

सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जाहीर करून तो तातडीने लागू करावा , आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा , पदोन्नतीबाबत तत्काळ निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी आंदोलन पुकारले आहे . त्यामुळे राज्यातील विद्यापीठांचे कामकाज विस्कळीत झाले आहे . त्याचा परिणाम म्हणजे विद्यापीठांना अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत .

Maharashtra14 News

Recent Posts

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

45 mins ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

10 hours ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

1 day ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

3 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

3 days ago