Shirur : हाथरस घटना … अण्णा हजारे यांनी केला निषेध , फाशी देण्याची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : उत्तर प्रदेशातल्या हाथरस बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी निषेध केला आहे . या नराधमांना फाशी देण्यात आली पाहिजे , असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे . असं दुष्कृत्य म्हणजे  समाजाला लागलेला कलंक असून मानवतेची हत्या झाल्याची टीका त्यांनी केली . अशी दुष्कृत्य रोखण्यात देशाची सुरक्षा व्यवस्था कमी पडत असल्याची टीका त्यांनी केली आहे . उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काही नराधमांनी एका मुलीसोबत दुष्यकृत्य केले आहे . हा मानवतेवरील कलंक आहे . ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे .

भारत हा ऋषीमुनींचा देश म्हटला जातो . भारताची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे . अशा देशात लाजेने मान खाली घालावी लागणारे दुष्कृत्य होणे हे योग्य नाही , अण्णा हजारे म्हणाले. आणखी एक चिंताजनक गोष्ट म्हणजे ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था , सांभाळायची , ते लोक यात कमी पडत आहेत . ही गोष्ट देशासाठी चिंताजनक आहे . असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून अशा नराधमांना फाशी देणे आवश्यक आहे , असे हजारे यांनी म्हटले आहे .

तर देशभर आंदोलन दरम्यान , हाथरस येथील निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी , या मागणीसाठी जळगावात जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय चर्मकार संघ आणि सर्वपक्षीय निवेदन देण्यात आले . फाशी दिली नाही तर देशभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला . हाथरस प्रकरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago