सचिन साठे यांनी आज तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा आज सकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रत्यक्ष भेटून दिला आहे. त्याला कारणही तसेच आहे, गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे मतभेद होत असून, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हा वाद चर्चेत आला होता. त्यामुळे नाराज झालेल्या साठे यांनी पदाचा राजीमाना दिला आहे, आणि आता शेवटचा बुरुजही ढासळला …
याबाबत सचि साठे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ते म्हणाले, ‘मी गेली २४ वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम करतो आहे. एनएसयूआय चा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून सात वर्षे पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. सोनिया गांधी यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ जिल्हाध्यक्ष म्हणून मला गौरविण्यात आले. पुढे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी राजीव सातव हे असताना मी उपाध्यक्ष होतो. माझे काम पाहून थेट प्रदेश काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदावर माझी नियुक्ती करण्यात आली सात वर्षे तिथेही काम केले.
नंतरच्या काळात पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारली. पिंपरी चिंचवड शहर वाढत असताना, पक्ष वाढीचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेसचे काम सुरू ठेवले तसेच ते वाढवले. पक्ष सांगेल ते काम केले, राष्ट्रवादीचे मातब्बर या शहरात आहेत. भाजपचे आमदार आणि महापालिकेत सत्ता आहे. शिवसेनेचे खासदार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला.
आता प्रगतीचा आलेख उंचावत असलेल्या पिंपरी चिंचवड स्मार्ट शहराला कोणाच्या रूपाने नवीन अध्यक्ष मिळणार ? आणि सचिन साठे यांना काँग्रेस न्याय मिळवून देणार का? हा येणारा काळच ठरवेल!
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…