पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स – बुधवार, ११ नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि. ११ नोव्हेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १२५ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून उपचार सुरू आहेत. तर १०५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष – राहटणी ( ७० वर्षे ) तर ०१ स्त्री- पिंपळे सौदागर ( ६३वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा.

कोविड -१ ९ आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी कोविड विषयक प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे . कोरोना बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होऊ शकतो , ही बाब लक्षात घेऊन फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे .

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे सातत्याने प्रयत्न केले जात आहे . विविध स्तरावर अहोरात्र केलेले प्रयत्न आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सध्या कोवीड नियंत्रणात येत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसत आहे . असे असले तरी कोविडची संसर्गजन्यता अधिक असल्यामुळे सर्वांनी काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे .

शारिरीक अंतरभान , सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर आणि वारंवार साबणाने सुयोग्य प्रकारे हात धुणे या बाबींचा नागरिकांनी अवलंब करावा असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले . कोविड बाधित रूग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी फटाक्यांचा वापर शक्यतो टाळावा अथवा कमीत कमी करावा . लोकहिताच्या दृष्टीने आणि नागरिकांना अधिक सजग राहून दिवाळीचा आनंद घ्यावा असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago