Categories: Uncategorized

“कोण म्हणतं मराठा एक होत नाही”! … “एक मराठा, जमला लाखो मराठा”; अंतरवालीत सभास्थळी जनसागराची वज्रमुठ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१४ ऑक्टोबर) :कोण म्हणतं मराठा एक होत नाही”! … “एक मराठा, जमला लाखो मराठा”;  सभास्थळी आज 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता लाखोंचा जनसागर लोटल्याचे पहायला मिळाले, यात मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे …

▶️कोण म्हणतं मराठा एक होत नाही : मनोज जरांगे

▶️मराठयांनो दहा दिवस गाफील राहू नका, मराठा समाजाला टिकणार आरक्षण हवंय!

▶️24 ऑक्टोबर पर्यंत आरक्षण मिळाले पाहिजे.

▶️22 ऑक्टोबर ला मराठा आरक्षणाची पुढील आंदोलनाची दिशा ठरणार

▶️मी माझ्या मराठा समाजाच्या शब्दापुढे जात नाही आणि जाणार नाही.

▶️मराठा समाजाने आरक्षण शांततेत मिळवायचे आहे.

▶️24 ऑक्टोबर च्या आत मराठा समाजास आरक्षण दिले नाही तर माझी अंत्ययात्रा निघणार किंवा मराठा समाजाची विजय यात्रा निघणार…

▶️24 तारखे नंतर मराठे मागे हटणार नाहीत.

छगन भुजबळ आणि गुणवंत सदावर्ते यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला उचकवण्यास सांगितले आहे, परंतु तसे करायचे नाही.

▶️मराठा समाजाने जगाला संदेश दिला आहे मराठा शांततेत राहून सर्व करू शकतात.

▶️तुम्ही मराठा समाजाच्या लेकरा बाळांना विष पाजू नका, मराठे हिंसावादी नाहीत.

▶️सरकारने माझे फेसबुक अकाउंट बंद केले, पण हा विशाल जनसागर पहा…

▶️मी तुम्हाला दिलेला शब्द खरा करून दाखवणार नाही, तो पर्यंत माझ्या उंबरठ्यावरही जाणार नाही.

▶️काहीही झाले तरी आपण सर्वांनी एकत्र राहायचे कोणीही वेगळे आंदोलन करायचे नाही, मराठयांना आरक्षण देणारच!

Maharashtra14 News

Recent Posts

द न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जंयती उत्साहात साजरी

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- 18/2/2025, पिंपळे गुरुव : प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे, द न्यु मिलेनियम इंग्लिश…

3 days ago

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टी धारकांच्या हक्काच्या घराचा “सदनिका हस्तांतरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त झोपडपट्टी…

1 week ago

सावधान ! आता… पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर

सावधान ! पिंपरी चिंचवड शहरात प्रदूषण करणाऱ्यावर महापालिकेची चोवीस तास करडी नजर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी…

1 week ago

मा.अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएच् डी प्रदान

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेंतर्गत अर्थशास्त्र विषयातील…

2 weeks ago

बारामती येथे कर्करोग मोबाईल व्हॅन व डिजिटल हेंड हेड एक्सरे मशीनचे राज्य सभा सदस्य खा.सौ. सूनेत्रा ताई पवार यांचे हस्ते लोकार्पण

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०९ फेब्रुवारी : आज दिनांक ०९ फेब्रुवारी रोजी महिला रुग्णालय बारामती येथे…

2 weeks ago

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सांगवी येथे आमदार चषक २०२५” उद्घाटन समारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात…

2 weeks ago