Categories: Uncategorized

कोण आहेत ? … अजित पवार गटाचे संभाव्य २० उमेदवार, यादी आली समोर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ सप्टेंबर) : राज्यात यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी थेट लढत होत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. पण सध्या सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. सध्या या दोन्ही घटक पक्षांच्या बैठका पार पडताना दिसत आहेत. महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी समोर आली आहे.

अजित पवार गटाची नुकतंच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असल्याचे दिसत आहे. तर बीड परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे.

अजित पवार गटाच्या संभाव्य 20 उमेदवारांची यादी :-
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील
परळी – धनंजय मुंडे
कागल- हसन मुश्रीफ
दिंडोरी – नरहरी झिरवळ
रायगड – अदिती तटकरे
अहमदनगर – संग्राम जगताप
खेड – दिलीप मोहिते-पाटील
अहेरी- बाबा अत्राम
कळवण -नितीन पवार
इंदापूर – दत्ता भरणे
उदगीर- संजय बनसोडेट
पुसद – इंद्रनील नाईक
वाई खंडाळा महाबळेश्वर – मकरंद आबा पाटील
पिंपरी – अण्णा बनसोडे
मावळ – सुनील शेळके
अमळनेर- अनिल पाटील
जुन्नर – अतुल बेनके
वडगाव-शेरी – सुनील टिंगरे

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड शहरातील रक्षक चौक येथील सबवेच्या कामाला गती; विहीत मुदतीत काम पुर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…

20 hours ago

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…

1 week ago

जीवनात प्रतिज्ञा महत्त्वाची : ज्ञानेश्वर महाराज कदम माजी आमदार विलास लांडे यांच्याकडून भंडारा डोंगर येथील मंदिर उभारणीसाठी एक कोटींची देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, ता. १६ :  जीवनात काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी प्रतिज्ञा करणे महत्त्वाचे…

3 weeks ago

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

सदगुणांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम समाजाकडून झाले पाहिजे - स्वामी गोविंददेव गिरी महाराज तुकाराम महाराजांच्या…

3 weeks ago