Categories: Uncategorized

‘ कबुतरांच्या उच्छादाने सांगवीकर हैराण, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला केव्हा जाग येणार ? … नागरिकांचा संतप्त सवाल!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ ऑक्टोबर) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतात. त्या उपयात कबुतरांना धान्य खायला टाकायला दिल्याने तुम्हाला पुण्य मिळते असे सांगितले जाते. पण सांगणाऱ्या ला हे घातक परिणाम ठरू शकते याची कल्पना नसावी. काहीही असो मानवी वस्ती आणि परिसरात हवेमुळे पसरणारी कबुतरांची पिसे अन् विष्ठा, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे कायमच बोलले जाते. पण, तरीही भयावह वेगाने वाढणार्‍या या पारव्यांना भूतदया या नावाखाली दाणे टाकण्याचे प्रकार काही थांबायला तयार नाहीत.

पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी भागातील शनी मारुती मंदिरा समोर असणाऱ्या मिलिटरीच्या मैदानात अनेक नागरिक या कबुतरांना धान्य टाकताना दिसतात, त्यामुळे पक्षी ही त्याठिकाणी येतात आणि आतातर त्यांचे प्रमाण खूप मोठया प्रमाणावर वाढले आहे. जेष्ठ नागरिक या ठिकाणी फिरायला येतात शेजारी नागरीवस्ती आहे, त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

ठाणे आणि पुणे महापालिकेने अशा अतिउत्साही पक्षिप्रेमींना पाचशे रुपयांचा दंड ठोठावणे सुरू केले आहे, आता पिंपरी चिंचवड महापालिकेलाही केव्हा जाग येणार ? असा प्रश्न परिसरातील नागरिक करत आहेत. या पक्षांच्या वाढीमुळे स्वस्तात पुण्य मिळण्याच्या नादात प्राणीमित्र किंवा असे उपाय करणारे अनेकांचे आयुष्य धोक्यात घालत असतात. पुण्यात आता अशा कबुतरांना धान्य टाकताना आढळल्यास किमान पाचशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पक्ष्यांवर प्रेम करावे, त्यांच्या हिताची काळजी घ्यावी; पण यामध्येही काही तारतम्य असावे.

“कबुतराच्या विष्ठेतून जीवाणूंचा प्रसार होऊ शकतो. निसर्गात प्रत्येत प्राण्याच्या आतड्यामध्ये जीवाणू असतात. ते दुसऱ्या प्राण्यांसाठी घातक ठरू शकतात. त्यांच्या विष्ठेमध्ये असलेल्या विषाणूमुळे ऍलर्जी असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते. कबुतरामुळे उद्भवलेला प्रश्न त्रासदायक आहे. इमारतीच्या कोपऱ्यामध्ये ही कबुतरे ढाबळी बनवतात तिथे त्यांचे चक्र सुरु असते. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांनीही काळजी घ्यायला हवी. काही जण प्राणी मित्र असतात. त्यामुळे काही ठिकाणी नागरिक उत्स्फूर्तपणे पक्ष्यांना दाणे टाकत असतात. एकाच जागी अन्न मिळाल्याने त्यांची प्रजनन क्षमता वाढते.

कबुतर अनेक प्रकारचे आजार फैलावू शकतात. त्यामध्ये ‘हिस्टोप्लास्मोसिस’सारख्या आजाराचा समावेश आहे. कबुतरांच्या विष्ठेत ‘एस्परगिलस फंगस’ नावाचा बुरशीचा एक प्रकार आढळतो. तो मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतो. कबुतरांची विष्ठा आम्लयुक्तही असते व त्यामुळे छत खराब होऊन लिकेजही होऊ शकते! लहान मुले, अस्थमाचे रुग्ण तसेच कमजोर रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या लोकांना कबुतरांच्या विष्ठेमुळे हिस्टोप्लास्मोसिस इन्फेक्शन होऊ शकते.

या संसर्गामुळे डोकेदुखी, ताप, कोरडा खोकला आणि सुस्तीसारखे फ्लुची लक्षणे दिसतात.’क्रिप्टोकॉकासिस फंगल इन्फेक्शन’चेही कबुतरे कारण बनू शकतात. त्यामध्ये फुफ्फुसे व चेतासंस्था कमजोर होते. हे सर्व विचारात घेता कबुतरांवर आपण जरूर प्रेम करावे; पण दुरूनच, इतका आपण धडा घ्यायचा!

Maharashtra14 News

Recent Posts

अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात….* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग….

*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…

5 days ago

पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे संयुक्त उपक्रमातून एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन

*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…

1 week ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने दिव्यांग सर्वेक्षणासाठी आशा सेविकांना देण्यात आले विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…

2 weeks ago

शंभरपेक्षा अधिक घरफोड्या, सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर  : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…

2 weeks ago

पुण्यात इंटेन्सिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत शाळा आणि महाविद्यालयात ‘एचआयव्ही’बाबत जागृती

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…

3 weeks ago