Categories: Editor Choice

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह, माजी मंत्री, आमदार व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ जानेवारी) :  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार धनंजय महाडिक, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री दतात्रय भरणे, पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी येऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसेच आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आणि कुटुंबियांचे गुरूवारी (दि. ५) सांत्वन केले.

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मंगळवारी (३ जानेवारी) रोजी निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकीय व सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन केले जात आहे.गुरूवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, उमा खापरे, पुणे शहर भाजपचे अध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, जगन्नाथ शेवाळे, विलास लांडे, पुणे महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे यांच्यासह सर्वांनी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप आणि कुटुंबियांचे सांत्वन केले. घरातील सर्वांची विचारपूस करत दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला.

Maharashtra14 News

Recent Posts

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश…

पाणी बचतीसाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विभागांना निर्देश... पाणी…

2 days ago

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

1 month ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 months ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 months ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago