Google Ad
Uncategorized

बोऱ्हाडेवाडी सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तसेच डुडुळगाव येथे गृहप्रकल्पाचे भूमिपूजन … भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २९ जुलै २०२३ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तसेच डुडुळगाव येथे साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन देखील प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, माधुरी मिसाळ, संग्राम थोपटे, भीमराव तापकीर, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, रविंद्र धंगेकर, अश्विनी जगताप, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, पिंपरी-चिंचवड शंकर जगताप, पुणे ग्रामीण (मावळ) शरद बुट्टे पाटील, (बारामती) वासुदेव नाना काळे यांच्यासह मुख्य सचिव मनोज सवनिक, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, के. एच. गोविंद राज, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पी. एमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Google Ad

महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी सुक्या कचऱ्यापासून ७०० टी.पी.डी क्षमतेच्या प्रकल्पामधून १४ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ज्यामध्ये १००० टी.पी.डी क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलीटी व ५०० टी. पी. डी क्षमतेच्या कंपोस्ट प्लांटचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १००० टी. पी. डी. क्षमतेचा मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी व ५०० टी. पी. डी. क्षमतेचा मॅकेनिकल कंपोस्ट प्लॅन्ट सप्टेंबर २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आलेला आहे. शहरातील दैनंदिन सुमारे १ हजार १५० मेगा टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. ७०० मेगा टन सुक्या कचऱ्यापासून १४ मेगावॅट वीजनिर्मिती करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी १२ मेगावॅट तयार झालेली वीज महानगरपालिका वापरणार आहे. हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नुसार ऍन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायवेट लिमिटेड यांच्या मार्फत विकसित केला गेला असून २१ वर्षे कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये खर्च झालेला आहे.

प्रकल्प चालविण्यासाठी सुमारे २.० मेगावॅट वीज लागणार असून उर्वरित वीज ओपन ऍक्सेस पद्धतीने मनपाच्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट आणि मैलाशुद्धीकरण केंद्रांसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी हिताची जोसेन, यांचे तंत्रज्ञान वापरण्यात आले असून त्यांना जगभरातील ५०० पेक्षा जास्त वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारण्याच्या कामाचा अनुभव आहे. हा प्रकल्प भारतीय शहरामध्ये गोळा होणाऱ्या कचऱ्याच्या गुणधर्मांचा विचार करून तयार करण्यात येणार असून त्यामध्ये कचऱ्याचे पुर्ण क्षमतेने ज्वलन व्हावे यासाठी मुव्हींग ग्रेटचा वापर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक पाणी चिखली येथील मैलाशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया केलेल्या पाण्यावर टर्शरी ट्रीटमेंट करून ५ एम.एल.डी पाणी वापरण्यात येणार असल्याने पिण्याच्या पाण्याची बचतही होणार आहे. महापालिकेचा हा महत्वकांशी प्रकल्प कार्यान्वित होत असून यामुळे कचरा डम्पिंग साठी अधिकच्या जागेची आवश्यकता भासणार नाही. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज बिलात सुमारे ३५ टक्के ते ४० टक्के बचत होणार आहे.

बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १२८८ सदनिका उभारण्यात आल्या आहेत. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सदनिकांचे हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत १२७.७० कोटी रुपये इतकी आहे. सिमाभिंत, अंतर्गत रस्ते, पथदिवे, पावसाळी गटर, पाणीपुरवठा नलिका, जलनि:सारण नलिका, ट्रान्सफॉर्मर इत्यादी मुलभूत सुविधा अंतर्गत कामे करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मलशुद्धीकरण केंद्र आणि सेंद्रिय कचरा विघटन या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने ११९० सदनिका उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी १८८.१८ कोटी रुपये खर्च होणार असून या प्रकल्पामध्येही विविध सोयी सुविधांची कामे करण्यात येणार आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!