Google Ad
Uncategorized

Pune : पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा … शहरातील वाहतूक मार्गात होणार असा बदल

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.२९जुलै ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जिल्हा प्रशानाकडून तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी स.पा. महाविद्यालय आणि पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोठा मंडप टाकला जात आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव तीन दिवस महाविद्यालयात चौकशी करूनच लोकांना सोडण्यात येणार आहे. या महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतुकीत काही बदल केले आहे.

Google Ad

पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी येणार असल्यामुळे पीएमपीच्या काही मार्गामध्ये बदल केला जाणार आहे.
१ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आणि आण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. ३५४ या मार्गांच्या बस जेधे चौक, सारसबाग या ठिकाणी जाणार आहे. त्याऐवजी ही वाहतूक लक्ष्मी नारायण टॉकीजकडून सारसबाग मार्गे होणार आहे. तसेच स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद होणार असल्यामुळे बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुटणार आहेत.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!