Google Ad
Uncategorized

जुनी सांगवी येथे शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण वर्ग ०५ डिसेंबर पासून सुरू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २५ नोव्हेंबर) : अहिल्यादेवी होळकर शाळा मैदान, गजनन महाराज मदिरा समोर,जुनी सांगवी येथे ऐतिहासिक शिवकालीन मर्दानी खेळ (लाठी-काठी, भाला, दांडपट्टा, ढाल – तलवार इ.) यांचे प्रशिक्षण वर्ग ५ डिसेंबर २०२२ पासून सुरू होत आहेत.

या प्रशिक्षण वर्ग उद्घाटन सोहळा दिनांक 1 डिसेंबर रोजी संपन्न होत असून या कार्यक्रमा विशेष उपस्थिती नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट तेरावे वंशज श्री.सुभेदार कुणाल मालुसरे , लव्हेरी हे याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंपरी चिंचवड मधील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या प्रशिक्षणाचे आयोजन आमदार  लक्ष्मण जगताप व चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.

Google Ad

महाराष्ट्राची लोप पावत असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मावळातील युद्ध कला व शौर्यसंस्कृती जतन व संवर्धन करणारी तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेच्यावतीने हे प्रशिक्षण वर्ग सुरू होत असून या प्रशिक्षण वर्गामध्ये पिंपरी चिंचवड मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिवप्रेमी, पालकांना व वय वर्ष ५पासून पुढे सर्वांना प्रवेश घेता येईल. हे प्रशिक्षण वर्ग आपली महाराष्ट्राची शौर्य संस्कृती असून आपणही या प्रशिक्षणात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शस्त्र व युद्धकला अभ्यासक रवींद्र यांनी केले आहे.
इंटरनेट व मोबाईलच्या आभासी युगात सर्वांना उपयुक्त असा हा प्रशिक्षण वर्ग जुनी सांगवी भागात सुरू होत असून सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजक सौ सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष डोनेट एड सोसायटी सांगवी) . यांनी केले आहे.

नाव नोंदणीसाठी संपर्कः ९५५२६२५९६१/ 9561383838

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement