Google Ad
Uncategorized

Pune : महापालिकतील कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी होणार गोड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०४ नोव्हेंबर) : पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची यंदाची दिवाळी गोड होणार असून, त्यांना बोनस देण्याचे आदेश सहाय्यक कामगार आयुक्त नि. अ. वाळके यांनी काढले असून, यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, हा बोनस महापालिका देणार नसली तरी महापालिकेच्या ठेकेदारांना बोनस प्रदान अधिनियम १९६५ लागू असल्याने त्यांच्याकडून ही रक्कम वितरित होणे आवश्‍यक आहे. या आदेशामुळे महापालिकेतील ९ हजार कामगारांना न्याय मिळाला आहे.

Google Ad

महापालिकेत सुमारे ९ हजार कंत्राटी कामगार असून, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस, सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी बुधवारपासून (ता. १) महापालिकेपुढे उपोषण सुरु केलेले होते. कंत्राटी कर्मचारी आणि कायम कर्मचारी समान काम करत असल्याने कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस मिळावा अशी मागणी लावून धरली होती.

महापालिकेने आम्ही किमान वेतन धोरणाप्रमाणे वेतन देत आहोत, त्यामुळे आम्ही बोनस देणार नाही. ही जबाबदारी ठेकेदाराची आहे अशी भूमिका घेतली. त्यासाठी गुरुवारी (ता.२) महापालिकेत बैठक घेतली होती, पण त्यात तोडगा निघाला नाही. दरम्यान आज महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे काँग्रेसच्या शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने बैठक घेतली.त्यामध्ये कायद्यानुसार ठेकेदाराने बोनस देणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. पण तसा आदेश महापालिकेकडे नसल्याचे सांगण्यात आले. अखेर यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून ठेकेदाराने बोनस देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट झाले. तसेच याबाबतचे पत्र सायंकाळी महापालिकेला पाठविण्यात आले आहे, असे अरविंद शिंदे यांनी सांगितले.

‘आज आम्ही आयुक्तांसोबत बैठक घेतली, त्याचप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्यांनी महापालिकेला पत्र पाठवून ठेकेदाराने बोनस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे एक पगाराऐवढी रक्कम लगेच जमा करावी लागणार आहे, अन्यथा महापालिकेने ही रक्कम देऊन नंतर ठेकेदाराकडून ती वसूल करून घ्यावी. गेल्या १० वर्षापासून बोनस बंद होता, त्यामुळे आजचा निर्णय हा ऐतिहासिक विजय आहे.’

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!