Google Ad
Uncategorized

पुणे रेल्वे स्टेशनजवळ तंबाखू न दिल्याच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ नोव्हेंबर) : पुणे शहर परिसरात गुन्ह्यांच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळ तंबाखू न दिल्याच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गातून जाणाऱ्या एका व्यक्तीवर चाकूने पोटात वार केल्याची घटना घडली.

तंबाखू न दिल्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात सूरज परताने (वय ३८, रा. परभणी) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Google Ad

सूरज परताने हा केटरिंग व्यवसायात आहे. तो रात्री दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गातून जात होता. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने सूरजला तंबाखू मागितली. त्याने तंबाखू न दिल्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने सूरजच्या पोटात चाकूने वार केला. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला आहे.जखमी सूरज परतानेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!