Google Ad
Uncategorized

सेल्फीच्या नादात … पिंपळे गुरव येथील उद्यानात हरवलेल्या चिमुकल्याला सांगवी दामिनी पथकाने केले आई वडीलांच्या स्वाधिन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे असणारे राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजे लहानापासून थोरांपर्यंत सर्वांच आवडतं ठिकाण, याच उद्यानात एक चिमुकल्याला शेजा-यांसोबत उद्यानात खेळण्या बागडण्यासाठी त्याच्या पालकांनी सोबत पाठवले होते. मात्र शेजा-यांच्या स्वतःचे सेल्फी फोटो काढण्याच्या नादात दुसऱ्याचा सोबत आणलेला लहान चिमुकला विसरल्याने तो हरवला, यापुढे त्यांना सोबत शेजारच्या लहान मुलाला आपण सोबत आणले होते याचे भानही राहिले नाही. एका तिस-याच व्यक्तीच्या हाताला धरून हा चिमुकला भरकटला तो चिमुकला त्या व्यक्तीचा हात सोडत नसल्याने तो व्यक्तीही अचंबित झाला.

प्रसंगी उद्यान परिसरात कर्तव्यावर असलेल्या सांगवी पोलिस स्टेशनच्या दामिनी पथकातील महिला पोलिस सुनिता जाधव, प्रियंका गुजर यांची गोंधळलेल्या अवस्थेत मुलाला धरून चाललेल्या त्या व्यक्तीकडे लक्ष गेले.पोलिस भाषेत त्यांनी काय रे मुल तुझं का विचारल्यावर त्याने नाही म्हणताच या दोन्ही दामिनींनी त्या चिमुकल्याला ताब्यात घेतले.तो हरवला असल्याची या पोलिस कर्मचाऱ्यांना खात्री झाली. उद्यानात शोधाशोध केल्यावर एव्हाना भानावर आलेल्या त्या शेजा-यांच्या ही गोष्ट लक्षात आली व पोलीसांसमोर हा मुलगा आमच्या सोबत आहे. आम्ही त्याला बागेत घेऊन आलो आहोत, तो आमच्या शेजा-यांचा मुलगा आहे. असे पोलिसांना सांगितले मात्र खातरजमा केल्याशिवाय मुल ताब्यात देणार नाही असे पोलिसांनी म्हटल्यावर त्या मुलाच्या आई वडिलांना बोलावून या दामिनींनी त्या चिमुकल्याला आई वडीलांच्या स्वाधिन केले.

Google Ad

सध्याच्या धकाधकीच्या काळात आई वडीलांनी स्वतची मुले स्वतः काळजी पूर्वक सांभाळावित . कुणाच्या स्वाधिन करून बिनधास्त राहू नये.काळजी घ्यावी असे आवाहनही पोलिसांनी केले.अशा प्रसंगांमुळे अनेक घटना , गुन्हे घडतात. पालकांनी जागरूक असायला हवे. मनोज वाघमारे हे इंदिरा वसाहत गणेश खिंड रोड कस्तुरबा नगर औंध येथे राहतात.ते गवंडी काम करतात.पत्नी आशा वाघमारे घरकामे करुन संसाराचा गाडा हाकतात.मुलगा रोहन वाघमारे वय ४ वर्षे यास त्यांच्या शेजारील रहिवासी रेखा सुर्यवंशी वय ३६ मुलगा स्वप्नील सुर्यवंशी,सायली सुर्यवंशी, समृद्धी सुर्यवंशी यांनी रोहन यास सोबत उद्यानात आणले होते.

शेजार धर्म व मुलाला लावलेला लळा यामुळे रोहनच्या आई वडीलांनी शेजा-यांसोबत रोहनला सोडले होते. यातून कीतीही सख्य असले तरी पालकांनी जागरूक राहून मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे. रोहनच्या आई वडीलांना बोलावून पोलिसांनी रोहनला आई वडीलांच्या स्वाधिन केले.यामुळे पालकांनी ही बोध घेणे गरजेचे आहे. सांगवी पोलिस स्टेशन महिला दामिनी पथकातील पोलिसांकडून पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात हरवलेल्या चिमुकल्याला आई वडीलांच्या स्वाधिन केल्याने आई वडिलांनी त्यांचे आभार मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!