Google Ad
Uncategorized

पिं.चिं.महापालिका प्राथमिक शिक्षकांचाही ‘धन्वंतरी’ योजनेत समावेश करा! … भाजपा शहराध्यक्ष ‘शंकर जगताप’ यांची आयुक्तांकडे मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ सप्टेंबर) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने धन्वंतरी योजना लागू करण्यासंदर्भात अनेकदा मागणी करण्यात आली. परंतु, प्रशासन या संदर्भात उदासीन आहे. परिणामी,  शिक्षकांच्या भावना तीव्र असल्याने तातडीने ही योजना प्राथमिक तथा सेवा निवृत्त शिक्षकांना लागू करावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शिक्षण संघटना कृती समितीच्या वतीने गेल्या सात – आठ वर्षांपासून ही योजना प्राथमिक तसेच सेवा निवृत्त शिक्षक यांना लागू करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी अनेकदा कृती समितीच्या वतीने बैठाका, सविस्तर निवेदने देखील देण्यात आली होती. मात्र पालिका प्रशासनाच्या टाळाटाळीने अनेक अनेक शिक्षकांवर वैद्यकीय खर्चाचा भार मोठ्या प्रमाणात पडत आहे.

Google Ad

प्राथमिक शिक्षक व सेवा निवृत्त शिक्षक हे दोन्ही आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत. या दोन महत्वाच्या घटकांना या सुविधेपासून वंचित ठेवणे योग्य नसून यामुळे दोन्ही घटकामध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी. अन्यथा शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने शिक्षण दिनाच्या दिवशी (५ सप्टेंबर) तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तात्काळ कार्यवाही करावी, अशी आगृही मागणीही शंकर जगताप यांनी केली आहे.

गेल्या सात ते आठ वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला असून] देखील प्रशासन प्राथमिक शिक्षक व सेवा निवृत्त शिक्षण यांच्या प्रश्नाबाबत अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ‘ शिक्षकांच्या एका वर्गाला एक न्याय व दुसऱ्या वर्गाला एक न्याय’ अशी दुटप्पी भूमिका प्रशासनाने घेवू नये. महापालिका आयुक्त आणि शिक्षण विभागाने धन्वंतरी योजनेचा लाभ प्राथमिक शिक्षक आणि सेवा निवृत्त शिक्षकांना द्यावा, अशी आमची मागणी आहे.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, शहर जिल्हा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!