Categories: Uncategorized

चिंचवड मतदार संघात महायुतीत बंडखोरी करणाऱ्या नाना काटे यांनी अखेर महायुती चा धर्म पाळला

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या बंडखोर नाना काटे यांनी अखेरवमाघार घेत महायुती चा धर्म पाळला. नाना काटेंचं हे बंड शमवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी देखील नाना काटे यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, आणि शंकर जगताप यांनी बोलल्या प्रमाणे अखेर नाना काटे यांनी माघार घेत शंकर जगताप यांना सपोर्ट केल्याचे दिसत आहे.

उप मुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईनतर नाना काटे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

नाना काटे हे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून इच्छुक होते. त्यामुळे दोन्ही कडील नेत्यांनी त्यांची समजूत काढली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आता महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी थेट लढत होणार आहे. राहुल कलाटे यांची चिंचवड विधानसभेची चौथी निवडणूक आहे, तर शंकर जगताप हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत.

दोन काटे एकत्र आल्याने शंकर जगताप यांची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे, भाजप चे शत्रुग्न बापू काटे आणि विठ्ठल उर्फ नाना काटे हे पिंपळे सौदागर या प्रभागाचे नेतृत्व करतात याठिकाणी भाजपला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असला तरी नाना काटे यांनी महानगरपालिका निवडणुकीत आपला प्रभाव दाखवला होता, त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्गही या भागात आहे, त्याचाच फायदा हे दोन्ही ही काटे एकत्र आल्याने महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना होणार आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुखर झाल्याचे सध्या तरी पहायला मिळत आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

7 days ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

2 weeks ago

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला भेट देत आरोग्य सेवांचा घेतला आढावा…

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १२ मार्च २०२६:* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर यांनी…

2 weeks ago

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

1 month ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

1 month ago