Google Ad
Editor Choice

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवार पासून (ता. ३१) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०जानेवारी) : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज वितरण व स्वीकृती मंगळवार ३१ जानेवारी पासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मनपाच्या थेरगाव येथील इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुरू केले आहे.

Google Ad

तिथे विविध कक्ष उभारले असून अर्ज वितरण, स्वीकृती, मतदार याद्या विक्री, संगणक, मीडिया सेल, आचारसंहिता अशा कक्षांचा समावेश होता. सोमवारी मतदार याद्यांची विभागवारी तपासणी सुरू होती.

०७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. ०८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत अर्ज माघारी घेता येणार आहेत. २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, दोन मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी महापालिकेतील २४५ कर्मचारी व अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यांच्याकडे मतदान कर्मचारी प्रशिक्षण, टपाली मतदान, निवडणूक साहित्य संकलन व वितरण, मतदान यंत्रे व स्ट्रॉंगरुम, कर्मचारी भत्ता वाटप, वाहन परवाना, आचारसंहिता पालन देखरेख, मीडिया सेल, वाहन अधिग्रहण, वाहतूक आराखडा व व्यवस्थापन, उमेदवार खर्च नोंदी, मतदार याद्या वितरण अशी कामे सोपविली आहेत.

▶️२०५ चिंचवड विधानसभा असे आहेत मतदार :
पुरुष : ३,०१,६४८
महिला : २,६४,७३२
तृतीयपंथी : ३५
एकूण : ५,६६,४१५

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!