Google Ad
Editor Choice

नवी सांगवीतील ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज’ च्या वतीने ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक -२६ जानेवारी) : नवी सांगवीतील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे विशेष महत्त्व म्हणजे सगळीकडे विशेष उत्साह जाणवत होता. सगळीकडे फुलांची आरास, सुंदर अशी विविध रूपात सजलेली नवीन वांस्तू , सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.

दोनशे वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्तता होऊन अनेक लोकांच्या बलिदानासोबत ७५ वर्षे पूर्ण होऊन ७६ व्या वर्षात पदार्पण झालेल्या भारतीय संविधानास या वर्षी ७४ वर्ष पूर्ण होत आहे . अशा या विशेष महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.आदित्य जगताप सर, स्कूल कमिटीचे पीटीए मेंबर मा. राजन पुरी व सौ.रीना यादव हे उपस्थित होते.

Google Ad

प्रथमतः मा.प्रमुख पाहुणे मा.आदित्य जगताप तसेच प्रतिष्ठित मान्यवर, मा. गणेश पाटील डॉ. देविदास शेलार, सदस्या मा.स्वाती पवार मॅडम, नगरसेवक, सर्व पीटीए मेंबर, कॉलेजच्या प्राचार्या मा.इनायत मुजावर मॅडम, प्रायमरीच्या मुख्याध्यापिका मा.जयश्री माळी मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ध्वजारोहन झाले. नंतर सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात झाली. पुर्व प्राथमिक व सेकंडरी विभागाच्या आयुष शिंदे (अप्पर केजी) तेजस्वी जाधव (२री) पूर्वा कोळी (८वी) रिया धोंगडी (९वी) या मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली.नंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन बरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गांधीजी ,भारतमाता, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर , अशी वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले. सगळ्यात अविस्मरणीय घटना म्हणजे भारत माता झालेली विद्यार्थिनी यांनी सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

प्राथमिकच्या छोट्या मुलांनी आपल्या मनोगतातून उपस्थितांची मने जिंकली. पूजा चौधरी यांनी मनोगतातून देशाबद्दलची भावना रसाळ शब्दात व्यक्त केली. शेवटी प्रमुख पाहुणे मा. आदित्य जगताप यांनी अत्यंत सुश्राव्य अशा शब्दात प्रजासत्ताक दिनाचे महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त करून आपल्या भाषणातून देशात स्वातंत्र्यच्या तत्कालीन परिस्थितीचा उल्लेख करत, जनतेस स्वतंत्र मिळालेले हक्क यांचा आढावा घेतला.तर रीना यादव यांनी राष्ट्र अभिमानाची भावना निश्चितच वृद्धिंगत होऊन राष्ट्रभक्तीशी संबंधित सर्वच मूल्य जोपासले जातील अशी ग्वाही आपल्या भाषणातून दिली.

अशा या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी संस्थेचे सदस्या मा.स्वाती पवार मॅडम, मा. देवराम पिजन सर,तसेच समाजातील सर्व स्तरातील मान्यवर, मा.गणेश पाटील, डॉ. देविदास शेलार, कॉलेजच्या प्राचार्या मा. इनायत मुजावर मॅडम ,प्रायमरी मुख्याध्यापिका मा.जयश्री माळी मॅडम व सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शिंदे व रिबेका पवार यांनी केले तर आभार पंकजा पाचारणे यांनी मानले शेवटी ‘वंदे मातरम’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!