Categories: Uncategorized

नवी सांगवीतील ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल’ व ज्युनियर कॉलेजच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु , गुरुर्देवो महेश्वरा:
गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”

महाराष्ट्र 14 न्यूज(दिनांक ०३ जून २०२३) : नवी सांगवी
येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न झाला. आषाढ महिन्यातील गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते. व वेद व्यास यांना प्रथम गुरूचा दर्जा देण्यात येतो. त्यानिमित्ताने इयत्ता पहिलीच्या मुलींनी गुरूंना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने सुरुवात झाली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या संचालक मंडळाच्या सदस्या मा.सौ.स्वाती पवार मॅडम उपस्थित होत्या. प्राचार्या इनायत मुजावर मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन केले. पाहुण्यांच्या स्वागता बरोबरच प्रायमरी मुख्याध्यापिका मा.सौ. जयश्री माळी मॅडम यांनी गुरुपौर्णिमे निमित्ताने सर्व शिक्षकवृंदाचे पुष्प देऊन सन्मान केला. नंतर आपल्या सर्व गुरूंच्या प्रती विद्यार्थ्यांच्या मनोगतात इ. १२ विज्ञान शाखेची सेजल निकाळजे व व वाणिज्य शाखेचा ओंकार पाटील यांनी भारतीय संस्कृतीमध्ये असलेली गुरुपरंपरा आपल्या मनोगतातून व्यक्त करून त्यांच्या प्रति कृतीज्ञता व्यक्त केली.आपल्या नृत्यातून इ८वी, व ९वी च्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदनेतून गुरुना नमन केले.

रिया पाटील,सोहम पवार या ३री च्या विद्यार्थ्यानी गुरुपौर्णिमेची माहिती सुंदररित्या गोष्टीतून स्पष्ट केली . कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.स्वाती पवार मॅडम यांनी विद्यार्थीना गुरुची महती आपल्या अनमोल शब्दातून स्पष्ट करत सांगितले की आयुष्यात जर प्रगती करायची असेल तर प्रत्येकाने आपल्या गुरुच्या प्रति विश्वास दाखवत त्यांच्याबद्दल कृतज्ञ रहावे व त्यांनी सांगितलेल्या मार्गावरूनच पुढे जावे. असा संदेश दिला.तर प्राचार्या इनायत मुजावर मॅडम यांनी आपल्या मनोगतात जो गुरूचा हात पकडतो त्याचे आयुष्यात कल्याण होऊन तो नेहमी सन्मार्गानेच पुढे जातो. व आपले इच्छित ध्येय साध्य करतो म्हणून गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरूनच सर्वांनी मार्गक्रमण करावे . व आपले आयुष्य सार्थकी लावावे. असा मोलाचा सल्ला दिला.

तसेच प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री माळी मॅडम यांनी आयुष्य घडवण्यात गुरूंचा कसा सिंहाचा वाटा असतो हे समजावून सांगितले. अशा या गुरुचे महत्व पटवून देणाऱ्या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मा.विजूअण्णा जगताप, सचिव मा.शंकर जगताप, मा. प्रा. प्रताप बामणे सर, देवराम पिंजण सर्व संचालक, सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी, व विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रिया धोंगडी व समृद्धी पाटीलने केले तर आभार वेदांत ने मानले. अशाप्रकारे उत्साहाच्या वातावरणात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला.

Maharashtra14 News

Recent Posts

आकुर्डी येथे माणुसकी पूर्णपणे संपली असल्याचे चित्र … नेपाळ धुमसत असताना एका नेपाळी तरुणाकडून मुक्या प्राण्याची तलवारीने निर्दयीपणे हत्या.!!!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 सप्टेंबर :- पिंपरी चिंचवड शहरातील अकुर्डीमध्ये रात्रीची वेळ असताना एका निष्पाप…

4 days ago

सभासदांना १५% लाभांश देत, आमदार शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली श्री गणेश सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.13 सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीगणेश सहकारी…

5 days ago

पायलट लायसन्स सेमिनार २१ सप्टेंबरला … पायलट होण्याची सुवर्णसंधी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 सप्टेंबर : विमान वाहतुकीत करिअर करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी. यंग…

6 days ago

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं

जिल्हा डॉजबॉल स्पर्धेत एच. ए. स्कूलचा डंका; दोन विजेतेपदावर नाव कोरलं पिंपरीत जिल्हा डॉजबॉल स्पर्धा…

1 week ago