Google Ad
Uncategorized

A.Nagar : सुशांतची हत्या झाल्याचं म्हणत असाल तर पुरावे द्या- रोहित पवार

महाराष्ट्र 14 न्यूज : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेकांकडून ही हत्या असल्याचं सांगण्यात येतंय. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची हत्या झाल्याचं तुम्ही म्हणता आणि पुरावेही देत नाही. तुमचे पुरावे तुमच्याकडेच ठेवता. मग सुशांत सिंग प्रकरणात तुम्हीच पुरावे दाबत आहात असं म्हणायचं का?, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर घणाघाती टीका केलीये.

Google Ad

सुशांतला न्याय मिळाला पाहिजे असं म्हणता आणि फक्त आरोप करता, हा काय प्रकार आहे?, असा सवालही रोहित पवार यांनी केला आहे. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीच्या निमित्ताने रोहित पवार आले होते. यावेळी सुशांत सिंग प्रकरणावरून त्यांनी भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला.

रोहित पवार पुढे म्हणाले, “भाजपचा सोशल मीडिया सक्षम असून एखादा ट्रेंड चालवणं त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जमतं. भाजपचे नेते शब्दात खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. आज सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तेच चालू आहे. भाजपकडे जर या प्रकरणातील पुरावे असतील, तर त्यांनी ते महाराष्ट्र सरकार व पोलिसांना द्यावेत. पुरावे नसताना ते गंभीर आणि मोठी वक्तव्यं करत असतील तर ते राजकारण करतायत.”

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी अखेर केंद्रीय अन्वेषण विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. बिहार सरकारच्या विनंतीवरुन CBIने सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!