Google Ad
Uncategorized

लॉक डाऊनवरून बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला ‘ठाकरे सरकारला’ आंदोलनाचा इशारा!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना लॉकडाऊनवरुन बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे . आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो , सगळं काही सुरू करा . आमचा अंत पाहू नका , आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका . कधी काय उघडणार याचं शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावं . रामभरोसे थांबवावं , अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू , असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत . तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला शिकावं , असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे .

कोरोना हॉटस्पॉटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी मृत्यू झाले आहेत . त्यामुले कोविडचा परिणाम आहे का नाही , याचा विचार करण्याची गरज आहे . पुण्यात गेल्यावर्षी मे महिन्यात ४,००७ मृत्यू झाले , यावर्षी मे महिन्यात १,६०५ मृत्यू झाले . मुंबईमध्ये मागच्यावर्षी ३,०४६ मृत्यू झाले , तर यावर्षी २,८६० मृत्यूंची नोंद झाली . केंद्र सरकारच्या विभागाकडून ही माहिती मिळाल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं . तसंच यावर्षी कोरोनामुळे किती मृत्यू झाले आणि इतर कारणामुळे किती मृत्यू झाले याची आकडेवारी सरकारने द्यावी , अशी मागणीही त्यांनी केली .

Google Ad

अशा परिस्थितीमध्ये लोकांचे हाल कधी थांबणार ? दुकानं कधी उघडणार ? एसटी बस कधी सुरू होणार ? राज्यात महापुराचं संकट येऊ घातलंय , कोविड कोविड करत बसण्यापेक्षा महापुराच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार ? ५ टक्के लोकांना अधिक धोका आहे , असं असताना ९ ५ टक्के लोकांना वेठीला का धरता ? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे . कोरोनाच्या काळात परीक्षा न घेता पास करणं चुकीचं आहे . कोविडमुळे पास झाला , असे व्हायला नको . यावर्षी नाही , पुढच्यावर्षी परीक्षा घ्या , पण घ्या , असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे .

कोरोना लॉकडाऊनवरुन बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे . आम्ही १० ऑगस्टपर्यंतची मुदत देतो , सगळं काही सुरू करा . आमचा अंत पाहू नका , आम्हाला कायदा मोडायला भाग पाडू नका . कधी काय उघडणार याचं शासनाने निश्चित वेळापत्रक सांगावं . रामभरोसे थांबवावं , अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू , असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत . तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यायला शिकावं , असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!