Google Ad
Uncategorized

Sindhudurg : विद्यार्थी हाच खरा देशाचा उगवता हिरा … विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० नोव्हेंबर) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळा बांदा येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते व विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ जिल्हा परिषद केंद्र शाळा, बांदा क्र 1 ला भेट दिली त्यावेळी ते येथे बोलत होते.

पावसामुळेजी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस मदत करताना कोकण भागातील बांदा हे गाव दुर्लक्षित राहिले होते. त्यावेळेस राजू मिसाळ यांनी कोकणात मदत पुरवली होती. बांदा आणि आजू बाजूच्या खेडोपाड्यात धान्य व जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा त्यांनी स्वतः हा येऊन केला होता.

Google Ad

त्यावेळेस बांदा येथील शाळेचे अतोनात नुकसान झाल्याचे आढळून आले. शिक्षण समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या सांगण्यानुसार शाळेतील संगणक पाण्यात गेल्याने पूर्ण खराब झाले होते, त्यानुसार आज शाळेत दोन संगणक व प्रिंटरचे सेट विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या स्वखर्चातून शाळेस मदत म्हणून देण्यात आले

यावेळेस शाळेचे मुख्याध्यापिका सौ नाईक मॅडम, श्री.पाटील सर, परब सर, शिक्षण समिती अध्यक्ष मोरजकर , राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष लाड , शिक्षण समितीचे सर्व सदस्य, शाळेचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

174 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!