Google Ad
Uncategorized

श्री ज्ञानेश्वरी लेखी पारायण सांगता सोहळा उत्साहात … उद्योजक ‘विजय पांडुरंग जगताप’ यांच्या कडून भाविकांना १००० ग्रंथ दान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) : एक वर्षा पूर्वी माऊलींच्या समाधीला, इंद्रायणीला आणि अजान वृक्षाला साक्षी ठेवून दररोज २५ ओव्या लिहायच्या हा संकल्प श्री ज्ञानेश्वरी जयंती समितीने केला होता. यावर्षी ज्ञानेश्वरी जयंतीच्या दिवशी तो नुकताच पूर्ण झाला. त्यानिमित्त आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात साडे तीन दिवसाचा सोहळा आयोजित केला होता.

आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात सोहळ्यानिमित्त काकडा, श्री ज्ञानेश्वरीचे पारायण, ज्ञानेश्वरीवर प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, माऊलींची आरती करून प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. भाविकांनी काल्याच्या दिवशी ग्रंथराज ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन समाधी मंदिराला प्रदक्षिणा घातली. श्री ज्ञानेश्वरी जयंती शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हभप योगीराज महाराज गोसावी यांची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा संपन्न झाली.

Google Ad

दुसऱ्या दिवशी वाणी भूषण हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन झाले. तिसऱ्या दिवशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी यांच्या वतीने हभप ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांची जागराची कीर्तन सेवा पार पडली. हभप अरुण महाराज येवले गुरुजी, सर्व शिष्य परिवार यांचे जागराचे भजन मंदिरात माऊलींच्या समोर झाले.

काल्याची किर्तन सेवा हभप विकासानंद महाराज मिसाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी मारुती कुरेकर, कासारवाडी येथील दत्त मंदिरातील स्वामी शिवानंद महाराज, सांगवी येथील दत्त मठातील तुकारामभाऊ महाराज, पंडित महाराज क्षीरसागर, आसाराम महाराज बडे, पुरूषोत्तम महाराज पाटील, महावीर महाराज सुर्यवंशी, प्रमोद महाराज पवार, सुखलाल महाराज बुचडे, अर्जुन महाराज फलके, नवनाथ महाराज मझिरे, दत्ता महाराज धुमाळ, माऊली महाराज आढाव, परमेश्वर महाराज वरकड, महापौर उषा ढोरे, यमुनाताई पवार, कुंदाताई भिसे, भारती विनोदे, कुंदाताई विनोदे यांची उपस्थिती लाभली.

ज्ञानेश्वरी सेवा समितीच्या माध्यमातून लेखण वह्या घरोघरी पोहचवनारे आप्पासाहेब बागल, दत्ताभाऊ चिंचवडे आदी थोर कीर्तनकारांनी, दिग्गज गायक, वादकांनी आणि राजकीय मंडळींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. आप्पासाहेब बागल. श्री ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ नेतृत्व हभप एकनाथ महाराज कोष्टी, ज्ञानेश्वरी कंठभूषण हभप ज्ञानेश्वर (माऊली) महाराज गोरे, हभप निवृत्ती महाराज बोरकर (शास्त्री) यांनी केले. भाविकांनी अन्नदान करण्यासाठी मदत केली. यामध्ये संदीप पवार, विजय आण्णा जगताप, विठ्ठल नाना काटे, शिवशंभू सेवा मंडळ, सौदागर, शंकरभाऊ मांडेकर, वसंत दादा कलाटे, राजाभाऊ वाघ, रविकांत धुमाळ, बाबाजी शेळके, समीर फाटक यांनी पंगती दिल्या.

संजय भिसे आणि जगन्नाथ काटे यांनी मंदिराला लायटिंग आणि साऊंड सिस्टीम सेवा, गोसेवक संजयबाप्पु बालवडकर यांनी वस्त्रदान, रामशेठ जांभूळकर यांनी पुष्प सजावट सेवा दिली. उद्योजक विजय पांडुरंग जगताप यांनी भाविकांना १००० ग्रंथ दान केले. या सोहळ्यात जवळ जवळ साडे सात हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या काल्याच्या पुरण पोळीच्या अन्नदानाने उत्सवाची गोड सांगता करण्यात आली. हभप संतोष महाराज पायगुडे, हभप निवृत्ती महाराज बोरकर (शास्त्री), हभप बाळासाहेब महाराज खरमाळे, हभप शेखर महाराज जांभुळकर, हभप श्रुतकीर्ती ताई धस यांनी आयोजक समिती सदस्य यांनी याप्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement