Categories: Uncategorized

चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन विशेष गौरव

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री. गजानन महाराज शिक्षण संस्था तसेच श्री विघ्नगर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका निलम तांबे यांचा ‘तेजस्विनी पुरस्कार’ देऊन विशेष गौरव।  करण्यात आला. माजी आमदार अश्विनीताई जगताप आणि मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक गिरीश छेडा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पा रेणुसे, विश्वस्त ऐश्वर्या रेणुसे, नगरसेवक विशाल तांबे, ज्येष्ठ पत्रकार पराग पोतदार, प्राईड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शर्मिला पांडे व विलासराव भणगे उपस्थित होते.

जिजाऊ व बालशिवाजी यांचे प्रतीक असलेले सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मोत्याची माळ, शाल व पुस्तके देऊन गणेश कला क्रीडा मंदिर येथे निलम तांबे यांना सन्मानित करण्यात आले. तेजस्विनी पुरस्काराचे हे नववे वर्ष होते.

या वेळी निलम तांबे यांच्या वतीने विशाल तांबे यांनी मनोगत व्यक्त करत हा गौरव अभिमानास्पद असल्याचे सांगून चिंतामणी ज्ञानपीठाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

2 weeks ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

2 weeks ago

४ वर्षांनं प्रशासकीय राजवट संपुष्टात.! पिंपरी चिंचवड’च्या महापौर पदी रवी लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर…

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड*…

3 weeks ago

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी नंतर पिंपरी चिंचवडमधील विकासकामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी “मॅरेथॉन बैठक” घेत शहरातील नागरिकांसाठी केल्या या मागण्या

किवळे, रावेत, मामुर्डी आणि  पुनावळ्यातील रस्त्यांसह ''पब्लिक अमेनिटीज'' विकसित करण्याची प्रशासनाला सूचना सांगवी आणि औंध उरो…

3 weeks ago

पिंपरी चिंचवड युवा सेनेची आदरांजली … विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ फेब्रुवारी : पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

3 weeks ago