Google Ad
Uncategorized

राष्ट्रवादी पवार गटाच्या सहा जागा निश्चित; कोणत्या जागेवर कोण लढणार निवडणूक? जाणून घ्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मार्च) : लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटासाठी सहा जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. बारामती, सातारा, रावेर, सातारा, शिरुर, नगर दक्षिण या जागावर पवार गट लढवण्याची शक्यता आहे.

या सहा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, रावेर – एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे, सातारा – श्रीनिवास किंवा बाळासाहेब पाटील आणि नगर दक्षिणमधून निलेश लंके यांचा समावेश आहे.

Google Ad

लोकसभा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. मात्र महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रस्तावावर अडून बसली आहे. त्यामुळे मविआच्या जागा वाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना शरद पवार यांनी यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर पवार गटाची सहा जागांवरील संभाव्य नावे समोर आली आहेत.

निलेश लंकेच्या पक्षप्रवेशात मोठा तांत्रिक अडथळा :

निलेश लंके हे आज शरद पवारांना भेटले असले तरी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश झालेला नाही. लंके यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला असता तर अजित पवारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा आधार घेत कारवाई त्यांच्यावर कारवाई केली असती. तसे झाले असते तर पुढील सहा वर्ष निवडणूक लढविण्यास अडचण येऊ शकते. हे ध्यानात घेऊन निलेश लंके यांच पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. आगामी काळात कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतील. आजच्या पत्रकार परिषदेत निलेश लंके, जयंत पाटील आणि शरद पवार यापैकी कुणीही लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतायत असे म्हणालेल नाही. फक्त त्यांच्या हातात तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे शरद पवार यांनी आपला हेतूही साध्य केला आणि निलेश लंके यांनाही पक्षांतरबंदीच्या कारवाईपासून वाचवले. ही खेळी खेळून शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपण आजही महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य असल्याचे दाखवून दिले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!