Categories: Uncategorized

सार्वजनिक जागा कचरामुक्त करून तयार केले जात आहेत ‘सेल्फी पॉईंट’! पिंपळे गुरव मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अनोख्या उपक्रमाचे पिंपळे होत आहे कौतुक

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०५ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपक्रम सुरू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी असा परिसर स्वच्छ करून तेथे ‘सेल्फी पॉईंट’ केले जात आहेत. अशा जागांवर सेल्फी काढण्यासाठी नागरिकांचीही लगभग वाढू लागली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सार्वजनिक जागा कचरामुक्त करीत तो परिसर सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २९ पिंपळे गुरव येथील शिवनेरी कॉलनी परिसर कचरामुक्त करत तो परिसर सुशोभित केला आहे.


…….

पिंपळे गुरव येथे राबवण्यात आली ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पना

पिंपळे गुरव येथील महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग ‘ड’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत आज दिनांक 5 मार्च 2025 रोजी शिवनेरी कॉलनी पिंपळे गुरव येथील GVP पॉईंट वर सौंदर्यकरण करण्यात आले. टाकाऊ वस्तूंचा वापर करून ‘वेस्ट टू आर्ट’ संकल्पनेंतर्गत खराब झालेले टायर, पुठ्ठा, मातीचा माठ, टाकाऊ सिमेंटचे पाईप यांचा उपयोग करून आकर्षक सेल्फी पॉईट तयार करण्यात आला आहे. यामध्ये कचऱ्यातील सर्व वेस्ट वस्तू पासून बेस्ट वस्तू बनवण्यात आल्या, त्यामधे टायर, तुटलेले पाईप, बॉटल्स दगड, इत्यादी वस्तूंचा वापर करण्यात आला. व त्या वस्तूंना विविध रंग रंगोटी देऊन सौंदर्यकरणाच्या वस्तू बनवण्यात आल्या. स्वच्छतेविषयक संदेश देणाऱ्या फलक पाटी बसवण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांना या सौंदर्याकरण च्या माध्यमातून आपला कचरा आपली जबाबदारी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात आला कचरा कुठेही टाकू नये, कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावे व आपल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला सहकार्य करावे तसेच आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे असा संदेश देण्यात आला. महानगरपालिकेला स्वच्छः सर्वेक्षण २०२४ मध्ये अव्वल येण्यासाठी सहकार्य करावे असे उपस्थित नागरिकांना आवाहन करण्यात आले.

यावेळी सुचिता पानसरे (क्षेत्रीय अधिकारी),  शांतराम माने (सहा. आरोग्य अधिकारी), रश्मी तुंडलवार (माननीय आरोग्य निरीक्षक),. राहुल ओव्हाळ (आरोग्य मुकादम ),अशोक सोनटक्के (आरोग्य मुकादम ), विजय पेंडे (बेसिक्स वॉर्ड ईंचार्ज), विजय पांडुरंग जगताप (उद्योजक), बेसिक्स टीम, परिसरातील उपस्थित महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

पिंपरी चिंचवड शहर कचरामुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘आर्ट टू वेस्ट’ ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे राबवत असून स्वच्छतेबरोबर कलात्मकता जपण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जात आहे. नागरिकांनी देखील आपले शहर कचरामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे.

विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

सार्वजनिक जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी तेथे स्वच्छता करून तो परिसर टाकाऊ वस्तूंचा वापर करून कल्पकतेने सजवण्याचा उपक्रम आरोग्य विभागाने हाती घेतला आहे. या अंतर्गत शहरातील विविध सार्वजनिक जागा स्वच्छ व सुंदर करण्यात येत आहेत. नागरिकांनी देखील सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता त्या जागांची स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.

सचिन पवार, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
……….

Maharashtra14 News

Recent Posts

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

4 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

4 days ago

केंद्राचा नवा प्लॅन! … महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलत, लोकसभेच्या २४ आणि विधानसभेच्या १०० जागा वाढणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल :  16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…

5 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

2 weeks ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

2 weeks ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

2 weeks ago