महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ डिसेंबर) : सांगवी येथील राही-माई प्रतिष्ठान संयुक्त प्रतिभा महिला प्रतिष्ठाण यांच्या वतीने गुणवंतांचाचा सत्कार समारंभ मल्हार गार्डन, नवी सांगवी येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी या कार्यक्रमात मा.आमदार आश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, शंकरभाऊ जगताप(शहराध्यक्ष), श्री.संतोष कांबळे, सौ.शारदा सोनवणे, श्री.हर्षल ढोरे, सौ.राणी ढोरे यांच्या शुभहास्ते गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम, विविध सहकारी संस्थेवर निवड झालेल्या मान्यवर तसेच सांगवी भागातील शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.
यामध्ये श्री.शिवलिंग किनगे ,श्री.प्रमोद ठाकर,श्री.नितीन खोडदे,श्री.सुमीत ढोरे,.(विविध सहकारी बॅक स॔चालक), श्री.कृष्णा भंडलकर.(सिनेट सदस्य), श्री.अक्षय नरेंद्र पुजारी(MPSC),दिग्विजय विश्वास मोरे (MPSC), डॉ.शुभम पंढरीनाथ दिवेकर (MD), श्री.अनिकेत अरुण दीक्षित (MAC), डॉ.पुष्कर पाटील (MBBS),डॉ.शीतल दिलीप तनपुरे (BHMS), डॉ.स्नेहल राजेंद्र गांधी (BHMS),डॉ.पुजा कालिदास शिंदे (BHMS),डॉ.मानसी पंडित (PHD),कु.गायत्री किरण दहिवाल (रोपिंग खेळाडू),कु.सिध्दी राजेंद्र मराठे (कबड्डी खेळाडू) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळवा आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागरूक व्हावा यासाठी त्यांच्या यशाचे कौतुक करणे आणि अपयशात त्यांना आधार देणे व योग्य मार्गदर्शन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, आणि यातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते”.
या कार्यक्रमास श्री.कैलास भागवत, श्री.दिलीप तनपुरे, श्री.संतोष ढोरे, श्री.गणेश ढोरे, सौ.दर्शनाताई कुभांरकर, सौ.संगिताताई दिक्षित, सौ.सारीकाताई भंडलकर, सौ.सोनाली शिंपी, सौ.राजेश्री लक्ष्मण ढोरे, श्री.दत्ता येणपुरे, श्री.वामनशेठ कड, श्री.मधुकर त्रिभुवन, श्री.गणेश काची, श्री.किरण दहिवाळ,श्री.भुषण शिंदे,श्री.अवि मारणे, श्री.सुरज चव्हाण, श्री.दत्ता म्हेत्रे विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या संयोजन मा.महापौर सौ.माई ढोरे,
श्री.जवाहर ढोरे यांच्या वतीने करण्यात आले होते, तर सुत्रसंचलन-श्री.नामदेवसर तळपे यांनी केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जानेवारी) : २१ जानेवारी २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय औंध पुणे यांनी…
व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री अश्विनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…