Categories: Uncategorized

पिंपळे गुरवमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला ‘गती’ – कॉलन्यांमध्ये चार महिन्यांत रस्ते होणार चकाचक – भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याहस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ डिसेंबर) : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना चांगले रस्ते आणि पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोणातून कार्यवाही करावी. पिंपळे गुरव आणि परिसरातील गृहनिर्माण सोसायटी, कॉलनींमधील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम आगामी चार महिन्यात पूर्ण करावे, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केली.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत पिंपळे गुरव येथील भीमाशंकर कॉलनी, गणेशनगर, विजयराज कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण कामाचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक सागर आंगोळकर, शशिकांत कदम, माजी नगरसेविका उषा मुंडे, माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप, अहिल्यादेवी सेवा संघाचे अध्यक्ष अजय दूधभाते, भाजपा शहर आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग कोरके, अनिता जाधव, रत्नमाला दूधभाते, महानगरपालिकेचे उपअभियंता सुनिलदत्त नरोटे, कनिष्ठ अभियंता स्वप्नील शिर्के, रंजना सुपे, हीरा विरनक, कल्पना बनसोडे, शांता साळुंखे, लक्ष्मी गोंदे, गिरीजा भोजने, अनुसया धादवड, सीमा साबळे, संगीता भांगरे, सीमा मोहिते, प्रदीप सामेरे, सुभाष मते, रमेश भागरे, भीमदेव गोंदे, तुकाराम शिंगाडे, प्रवीण मोहिते, सुनील भोजने, अण्णासाहेब वाघमोडे, अजय टिळेकर, पंढरीनाथ राणे यांच्यासह भीमाशंकर कॉलनी, विजयराज कॉलनी आणि गणेश नगर  येथील नागरिक उपस्थित होते.शंकर जगताप म्हणाले की, शहरातील  दर्जेदार रस्ते, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कायम सकारात्मक पुढाकार घेतला आहे.  नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील रस्ते सुसज्ज करण्यासाठी आता कालबद्ध कायक्रम आखणे अपेक्षीत आहे. प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना पायाभूत सोयी-सुविधा सक्षम कराव्यात यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत.

‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम, प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मुख्य रस्ते प्रशस्त होत आहेत. त्याच्या जोडीला शहरातील अंतर्गत रस्ते सुसज्ज असावेत. प्रत्येक प्रभागात रस्त्यांची कामे मार्गी लावावीत. यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे प्राधान्याने मार्गी लावावीत, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
– शंकर जगताप, भाजपा, शहराध्यक्ष, पिंपरी- चिंचवड.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago