महाराष्ट्र 14 न्यूज, दि२३ फेब्रुवारी: पुणे महापालिकेडून मोठी नोकरीभरती करण्यात येणार आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात ४४८ पदांची भरती पूर्ण केल्यानंतर आता याचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ११ प्रकारच्या पदांसाठी ३४० जागांची भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे.
यामध्ये अग्निशामक दलाचे २०० पदे, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची २० पदे, आरोग्य निरीक्षकांसाठी ४० पदे व इतरही पदांची भरती होणार आहे. यासह इतर विभागातील पदांची देखील भरती होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.
राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविली गेली होती. यामुळे पालिकेने मागीलवर्षी कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक, लिपिक पदाच्या तब्बल ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. आयबीपीएस संस्थेकडून आॅनलाइन परीक्षा पारदर्शकपणे पार पाडली, त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत घेतले आहे. या पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता आणखी ११ पदांसाठी एकूण ३४० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
यामध्ये अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी रोस्टर तपासणी करून तब्बल ३४० पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे दिला होता. आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या प्रस्तावानुसार आयबीपीएस या कंपनीकडेच भरतीची जबाबदारी दिली जाणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…