Categories: Editor Choiceindia

Rajasthan : धक्कादायक : शाळेतून घरी जात असताना काही जमावाने शिक्षकाला अडवलं व त्याच्यावर नाक , कान कापत केला जीवघेणा हल्ला!

महाराष्ट्र 14 न्यूज : राजस्थानमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बाडमेर भागात एका शाळेतील शिक्षकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. शाळेतून घराच्या दिशेने जाणाऱ्या या शिक्षकाला जमावाने घेरले व त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्याला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजस्थानातील बाडमेर येथे एका शाळेतील शिक्षकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शाळेतून घराच्या दिशेने जाणाऱ्या या शिक्षकावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिक्षकाचे नाक व कान कापून टाकण्यात आले. बाड़मेर जिल्ह्यातील भटाला गावातील घटनेमागे प्रेम प्रकरणाचं कारण सांगितले जात आहे. या घटनेत शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षकावर मुलीला पळवल्याचा आरोप आहे.

बुधवारी या शिक्षकावर ज्या लोकांनी हल्ला केला ते पळवलेल्या तरुणीचे कुटुंबीय असल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीने भाऊ व काही नातेवाईकांनी मिळून शिक्षकाचं नाक व कान कापले. शिक्षकाला प्राथमिक उपचारासाठी त्याचे कुटुंबीय अहमदाबाद येथे घेऊन गेले आहेत. बाड़मेरच्या रागेश्वरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रागेश्वरीचे पोलीस प्रमुख महेंद्र सीरवी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्याकडून पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Maharashtra14 News

Recent Posts

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

3 hours ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

15 hours ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

1 day ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

4 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

4 days ago

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

5 days ago