Google Ad
Uncategorized

अजित पवार यांचं धक्कातंत्र … पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्षपदी सुनील चांदेरेंची वर्णी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जानेवारी) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडलीय. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील ३ ते ४ नावं चर्चेत होती. यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार अशोक पवार , माजी आमदार रमेश थोरात ही नावं चर्चेत होती. मात्र, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रा. दिंगबर दुर्गाडे  यांचं नाव निश्चित केलं आहे. दिंगबर दुर्गाडे यांनी  यापूर्वी देखील जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरे  यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे. अजित पवार सर्व निवडून आलेल्या संचालकांची बैठक घेत नाव निश्चित केलं आहे. जिल्हा बँकेवर १७ जागा जिंकत राष्ट्रवादीने वर्चस्व कायम ठेवलंय.

अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी  तासभर बैठक

अजित पवार बँक संचालक यांच्यातील जिल्हा बँक अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदाबाबतची बैठक संपली आहे. जवळपास एक तास संचालकांशी अजित पवारांनी चर्चा केली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर सर्व संचालक निवडणुकीसाठी जिल्हा बँकेकडे रवाना झाले होते. एक तास चाललेल्या बैठकीत अजित पवार यांनी इच्छुकांची मतं जाणू घेतली असल्याचं कळतंय.

Google Ad

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. १९९१ पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!