Google Ad
Celebrities Pune

Pune : १२७ वर्षाची वैभवशाली परंपरा असलेला श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव यंदा प्रथमच मुख्य मंदिरात होणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : विघ्नहर्ता गणेशाचे आगमन काही दिवसावर येऊन ठेपले आहे. सर्व गणेशभक्त ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामदौल रद्द करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचा गणेशोत्सव मुख्य मंदिरामध्येच करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला.१२७ वर्षाची वैभवशाली परंपरा असलेला हा गणेशोत्सव यंदा प्रथमच मुख्य मंदिरात होणार आहे.

गणेशभक्त आणि नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. भव्यदिव्य देखाव्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ओळखला जातो. दरवर्षी देशभरातील प्रमुख मंदिरांचे भव्यदिव्य देखावे साकारण्यासाठी म्हणून या गणपती ट्रस्टची ओळख आहे. हा देखावा पाहण्यासाठी पुण्यासह राज्यभरातून नागरिक येत असतात. परंतु दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून आणि बाप्पांच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहून रस्त्यावर होणारा हा उत्सव मंदिरातच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

34 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!