महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ एप्रिल) : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा वाढदिवस म्हटलं की मित्रांबरोबर पार्टी, मजा मस्ती हे समीकरण बनले आहे. मात्र प्रतीक अमर दांगट या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसानिमित्त या सर्व गोष्टींना बाजूला सारत एक आगळावेगळा निर्णय घेत महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट झोपडपट्टी समोर रहिवासी असलेल्या एका अंध महाविद्यालयीन मुलीचे एक वर्षाचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
प्रतीक सुद्धा एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून त्याने आपल्या साठवलेल्या पैशातून गरवारे महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या गरीब कुटुंबातील एका अंध मुलीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. याविषयी बोलताना प्रतीक अमर दांगट म्हणाला, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मी हा निर्णय घेतला आहे, तर विद्यार्थिनीने मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.याप्रसंगी अभिषेक गौड,सागरराज बोदगिरे, समीर देसाई,ऍड स्वप्नील जोशी,सागर माने,सहा.पो. फौजदार नवनाथ अडसूळ, कार्तिक थोटे उपस्थित होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…