Categories: Uncategorized

विधानसभेचं ‘उपाध्यक्षपद’ पिंपरीला … महायुतीकडून ‘अण्णा बनसोडे’ यांचा अर्ज दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधानसभा उपाध्यक्षपदासाठी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवडला एकही पद देण्यात आले नव्हते. त्यामुळे आण्णा बनसोडे यांच्या रूपाने महायुती सरकारने पिंपरी-चिंचवडकरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड शहराला २५ वर्षानंतर मंत्रिपद दर्जा असणाऱ्या पदावर संधी मिळाल्याने पवार गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून अण्णा बनसोडे यांना संधी मिळाली आहे. २०१९ च्या अजित पवारांच्या भाजपशी झालेल्या पहिल्या शपथविधीपासून तर, २०२३ च्या सत्तासंघर्षाच्या काळात बनसोडे अजित पवारांच्या पाठीशी उभे राहिले. बनसोडे यांनी सुरुवातीला २००९ मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढविली. विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार हे विजयी झाले. त्यानंतर २०१९ बनसोडे पुन्हा विजयी झाले. २०२४ च्या पिंपरी विधानसभा निवडणुकीमध्ये बनसोडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या एका गटाने थेटपणे विरोध केला होता. तर भाजपनेही या जागेवर दावा केला होता, असे असतानाही त्यांच्या पाठीशी अजित पवार ठामपणे उभे होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एकत्रित येऊन नाराजांची समजूत काढली होती. बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात विरोधात असणारे राष्ट्रवादीतील स्थानिक नेते आणि भाजपतील नेतेही बनसोडे यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. पिंपरी विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यानंतर बनसोडे यांना मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र मंत्रिपदाऐवजी मंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या विधानसभा उपसभापती पदी संधी मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शहराचे नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांना १९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण, सांस्कृतिक मंत्री म्हणून संधी मिळाली होती. त्यानंतर २००३ मध्ये प्राध्यापक मोरे यांचे निधन झाले आणि काँग्रेसची ताकद कमी होण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे काँग्रेसचे मोहरे फोडून अजित पवार यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यास सुरुवात केली. पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती.

Maharashtra14 News

Recent Posts

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित…

5 days ago

महाराष्ट्रात ‘NA’ ची गुंत्यातून कायमची मुक्तता; आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही..वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१२ फेब्रुवारी : राज्यात कृषी क्षेत्र अकृषक करताना एन. ए. परवानगीची अट…

6 days ago

४ वर्षांनं प्रशासकीय राजवट संपुष्टात.! पिंपरी चिंचवड’च्या महापौर पदी रवी लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर…

*पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर पदी रवि लांडगे तर उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड*…

2 weeks ago

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी नंतर पिंपरी चिंचवडमधील विकासकामांसाठी आमदार शंकर जगताप यांनी “मॅरेथॉन बैठक” घेत शहरातील नागरिकांसाठी केल्या या मागण्या

किवळे, रावेत, मामुर्डी आणि  पुनावळ्यातील रस्त्यांसह ''पब्लिक अमेनिटीज'' विकसित करण्याची प्रशासनाला सूचना सांगवी आणि औंध उरो…

2 weeks ago

पिंपरी चिंचवड युवा सेनेची आदरांजली … विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ फेब्रुवारी : पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार…

2 weeks ago