महाराष्ट्र 14 न्यूज, दि.11 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. एकीकडे कोयता गँगची दहशत पसरत असताना पिंपरी चिंचवड दुहेरी हत्याकांडाने हादरलं आहे.
जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनीच आरोपीला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. काय आहे घटना? पिंपरी चिंचवड शहरात रात्रीच्या सुमारास जमीन खोदण्याच्या टिकावाने पती-पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली.
शहरातील दापोडी परिसरात ही घटना घडली. या घटनेत 61 वर्षीय शंकर नारायण काटे आणि त्यांची 55 वर्षीय पत्नी संगीता काटे यांचा जागीच मृत्यू झाला. 45 वर्षीय आरोपी प्रमोद मगरुडकर खून करून मयत दाम्पत्याच्या रक्ताने माखला होता. तो स्वतःही जखमी झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत हातात टिकाव घेऊन रस्त्याने फिरत असताना नागरिकांनी त्याला पकडले आणि घटनेबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याने दोघांचा खून का केला? याचा तपास भोसरी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…