पिंपरी चिंचवड महापालिकेची गेल्या सहा वर्षांपासूनची ‘ धन्वंतरी स्वास्थ्य योजना ‘ झाली बंद … आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतलेल्या निर्णयाचा कर्मचाऱ्यांकडून निषेध!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी – चिंचवड महापालिका सेवेतील व सेवानिवृत्त अधिकारी , कर्मचारी यांच्या सेवाकाळात व निवृत्तीनंतर येणारे आजार व त्यावरील उपचार याच्यासाठी २०१५ पासून ‘ धन्वंतरी स्वास्थ्य योजना ‘ सुरू आहे . या सेवेकरिता कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून काही हिस्सा व बाकी रक्कम महानगरपालिकेची अशी ही योजना मात्र बंद करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे . या निर्णयाविरोधात पिंपरी – चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ( ता . ८ सप्टेंबर ) महापालिका प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून दिवसभर काम करीत, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आणि सरचिटणीस सुप्रिया सुरगुडे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवला .

अंबर चिंचवडे म्हणाले , “की १ सप्टेंबर २०१५ पासून धन्वंतरी स्वास्थ्य योजना सुरू आहे . मात्र , आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक १४ सप्टेंबर २०२० पासून रात्री १२ नंतर ही योजना स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे . या गोष्टीचा निषेध नोंदविण्याकरताच काळी फित लावून कोरोनाच्या या संकट काळात कोणाचीही गैरसोयी होऊ नये म्हणून कामकाज सुरू ठेऊन निषेध करत आहोत”.

ही योजना बंद करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आदेश काढण्यात आले आहेत, यात आयुक्तांनी म्हटले आहे की, सर्व पॅनेलवरील रुग्णालयांनी १५ सप्टेंबरच्या पहाटे एकनंतर धन्वंतरी योजनेतील कोणत्याही सभासदांना या योजनेअंतर्गत उपचाराकरिता दाखल करून घेऊ नये. आयुक्तांच्या या निर्णयाला कर्मचारी महासंघाने तीव्र विरोध केला आहे . कोरोनाच्या महामारीत ‘धन्वंतरी स्वास्थ योजना’ ही वैद्यकीय योजना कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची ठरत होती . प्रशासनाने कोरोनाच्या संकट काळात ही योजना बंद करणे अतिशय चुकीचे आहे . आयुक्तांनी हा निर्णय मागे घ्यावा . अन्यथा कर्मचाऱ्यांच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महासंघाच्या वतीने ‘अध्यक्ष अंबर चिंचवडे’ यांनी दिला आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago