*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात*
*पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे संयुक्त उपक्रमातून एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन*
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २९ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग पुणे व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरात एक लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार असून या मोहिमेचा प्रारंभ आज डुडूळगाव येथे महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या शुभहस्ते झाला.
याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, वन विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, उप उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावे, उद्यान निरीक्षक दादा गोरड, उद्यान सहाय्यक सचिन शिनगारे, शिवाजी बुचडे, प्रथमेश सीनकर, वन विभागाचे वनपाल शीतल खेंडके, प्रमोद रासकर, वनरक्षक अशोक गायकवाड, बाळासाहेब जीवाडे, अंकुश कचरे, कोमल सपकाळ, प्रिया आकेन, प्रीती नागले, ओंकार गुंड, अनिल राठोड, संगीता कल्याणकर, ह.भ.प. प्रभाकर महाराज मोरे, सामाजिक कार्यकर्ते वंदना वहिले, रमेश वहिले, हिरामण आल्हाट, नगाजी वहिले यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले, ‘वृक्ष म्हणजे मानवाचे खरे सोबती आहेत. देशी वृक्ष लागवड व संवर्धन करून भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, पाणी व निरोगी वातावरण मिळू शकते. येथील वसुंधरेला वाचविण्यासाठी देशी वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. देशी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते मोठे करण्याचा संकल्प करावा.’
दरम्यान, डुडूळगाव येथील मोहिमेमध्ये निसर्गाशी सुसंगत वाढणारे वड, पिंपळ, आंबा, जांभूळ, चिंच, कडुनिंब, बहावा, पळस, उंबर, आवळा, साग, करवंद, शेवगा, जास्वंद, काटेसावर, बेल, अर्जुन, सिरिस, पांगारा, कांचन, हिजळ, पन्हाळ, खैर, शेवती, तामण, सोनचाफा, पारिजात, मोरिंगा, पांगळी, करवंद काटेरी, सावर, कडंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. हे सर्व वृक्ष स्थानिक हवामान व मातीला अनुरूप आहेत.
….
*म्हणून देशी वृक्षांची केली जाणार लागवड*
१. पर्यावरणीय संतुलनासाठी – देशी वृक्ष स्थानिक माती, पर्जन्यमान व हवामानाला सहज अनुरूप असल्याने त्यांची जोपासना सोपी होते. हे वृक्ष मातीची धूप थांबवतात, भूजलपातळी वाढवतात व हवामान बदलाचा परिणाम कमी करण्यास मदत करतात.
२. जैवविविधतेसाठी आश्रयस्थान – पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे यांना देशी वृक्ष सुरक्षित अधिवास पुरवतात. या वृक्षांच्या फुला-फळांमुळे स्थानिक प्रजातींचे पोषण व संवर्धन होते.
३. औषधी व आरोग्यदायी गुणधर्म – नीम, आवळा, बेल, अर्जुन यांसारखे देशी वृक्ष औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून आरोग्यवर्धक आहेत. ग्रामीण व नागरी भागात पारंपरिक उपचारपद्धतींमध्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
४. सांस्कृतिक व धार्मिक मूल्य – वड, पिंपळ, आंबा, बेल यांसारख्या वृक्षांना भारतीय संस्कृतीत विशेष स्थान आहे. विविध धार्मिक विधी, सण व परंपरांमध्ये या वृक्षांचे महत्त्व अधोरेखित झालेले दिसते.
५. आर्थिक फायदे – आंबा, चिंच, जांभूळ, करवंद यांसारख्या फळझाडांमधून पोषणासह शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो. तसेच लाकूड, औषधी पदार्थ, पाने, बिया यांचा विविध उद्योगांमध्ये उपयोग होतो.
६. शहरी भागासाठी उपयुक्त – देशी वृक्ष प्रदूषण शोषून घेण्याची क्षमता अधिक असल्याने शहरी परिसरात ते हवा शुद्ध ठेवतात. छाया व हरितपट्टा निर्माण करून नागरिकांना आरोग्यदायी वातावरण देतात.
…..
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने देशी वृक्ष लागवडीचा हरित उपक्रम हाती घेण्यात आला असून पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. देशी वृक्ष लागवड ही केवळ एकदिवसीय मोहिम न मानता त्याचे संवर्धन हे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला पाहिजे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
…..
देशी वृक्ष हे निसर्गाच्या संतुलनाचे रक्षक आहेत. स्थानिक हवामान, माती व पर्जन्यमानाशी जुळवून घेणाऱ्या या वृक्षांची वाढ सुलभ होते. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरामध्ये एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ५० हजार वृक्ष लावण्यात येणार असून त्याची सुरुवात आज करण्यात आली आहे.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…..
देशी वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग आणि वेदव्यास प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे हरित उपक्रमाची पायाभरणी केली आहे. या मोहिमेतून भविष्यातही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून नागरिकांसाठी आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.
– महेश गारगोटे, मुख्य उद्यान अधीक्षक, पिंपरी चिंचवड महापालिका
…..
*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “श्रमदान एक दिवस –…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर : डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच लंडन ब्रिज, युरोपियन…