पिंपरी चिंचवड मनपाची पुढील दहा दिवस शहरातील २०० भागांमध्ये Antibody तपासणी मोहीम … नागरिकांनी सहकार्य करण्याचे महापौरांचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सिरो सर्व्हे करण्यात येणार असून यामध्ये शहरातील सुमारे १० हजार नागरिकांचे रक्त नमुने तपासण्यात येणार आहेत. या कामासाठी घरी येणा-या महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकास रक्त नमुने घेण्याकामी शहरवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव पहिल्या व दुस-या लाटेमध्ये झालेला आहे. संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातील दहा हजार नागरिकांच्या Antibodies तपासणी करण्यात येणार आहेत. त्याचा उपयोग शहरातील किती नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार झाली आहे याचा अंदाज घेण्यासाठी होईल जेणेकरून संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील उपचार करणे शक्य होईल.

महानगरपालिकेच्या ८ रुग्णालयांमधून प्रत्येकी ३ टीम तयार करण्यात येणार असून यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी असे १५० जणांची याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. सदर टीमद्वारे पुढील दहा दिवस शहरातील २०० भागांमध्ये Antibody तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून ही समाधानकारक बाब असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य आणि प्रशासन विभागास त्याअनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना देखील महापौर माई ढोरे यांनी दिल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

17 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago