Categories: Uncategorized

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार अत्यंत आक्रमक प्रचार करत आहेत. ते थेट अजित पवार यांच्यावर घणाघात करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा रोहित पवार यांनी अजितदादांना थेट आव्हान दिले आहे. ते दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये जाहीर प्रचारसभेत बोलत होते.

दौंडमधील या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, रोहित पवार, भूषणसिंह होळकर हे नेते या सभेला उपस्थित आहेत. या सभेत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली.

रोहित पवार म्हणाले, आमचे कुटुंब फोडले. आमचा एक नेता पळवून नेला आणि त्याला इथे उभे केले. त्यांना वाटत होते की पवारसाहेब या मतदादरसंघात अडकून पडतील. पण पवारसाहेबांनी राज्यात ५४ सभा घेतल्या.

अजित पवारांना थेट आव्हान देताना रोहित पवार म्हणाले, अजितदादा तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बोलवा. महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही. आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणेल.

रोहित पवार पुढे म्हणाले, अजित पवार जर तुम्ही पवारसाहेबांना वडील म्हणत होतात. मग लोकांना वाटत आहे की तुम्ही वडिलांचे झाले नाहीत, तर जनतेचे काय होणार?

रोहित पवार म्हणाले, उद्या पवार साहेबांचा पालकमंत्री असणार आहे. पवार साहेब तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील. तुम्ही अडचणीत होतात म्हणून सोडले. मलाही एखादे पद भेटले असते. कारवाई झाली नसती पण गेलो नाही. आपण सर्व साहेबांसोबत आहोत.

रोहित पवार म्हणाले, सुप्रियाताईंना तिसऱ्यांदा खासदार करायचे आहे. ही निवडणूक आपण भाजपच्या विरोधात लढत आहोत. ही लढाई शरद पवारसाहेब विरुद्ध भाजप आहे. सामान्य नागरिक विरूद्ध भाजप आहे. जनतेसाठी या लोकांनी काय केले? सामान्य लोकांच्या हितासाठी हे सत्तेत गेले नाहीत. स्वतःचा विकास करण्यासाठी गेले आहेत, असे म्हणत रोहित पवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

1 day ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

2 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

4 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

4 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

4 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago