Categories: Editor Choice

पिं. चिं.महानगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या येणा-या आणि झालेल्या सुमारे ७१ कोटी  ६५  लाख रुपये खर्चास स्थायी समितीने दिली मान्यता!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १६ जून २०२१) : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या येणा-या आणि झालेल्या सुमारे ७१ कोटी  ६५  लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची ऑनलाईन पध्दतीने सभा  पार पडली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

प्रभाग क्रमांक २१ जिजामाता हॉस्पीटलची सीमाभिंत बांधणे व उर्वरित स्थापत्य  विषयक कामे करण्याकामी ६७ लाख ३७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.६ मधील धावडे वस्ती व  परिसरात  स्थापत्य विषयक सुधारणेची कामे करण्याकामी ५९ लाख ७२ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक ४ दिघी बोपखेल मधील रामनगर येथे ठिकठिकाणी ट्रिमिक्स कॉक्रीट करण्याकामी ५६ लाख ५७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१७ परिसरामध्ये विविध कंपन्या आणि मनपा मार्फत खोदण्यात आलेले चर डांबरीकरणाने दुरुस्त करण्यासाठी ५३ लाख ६५ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

ब प्रभागात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार डांबरीकरण करण्याकामी ५९ लाख ४५ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१८ चिंचवड येथे मोरया गोसावी मंदिर शेजारी दशक्रिया घाट परिसराची स्थापत्य विषयक कामे करण्याकामी ६१ लाख ५९ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.३२ मध्ये विविध परिसरात सुशोभिकरण व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी २७ लाख १० हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.२ कुदळवाडी जाधववाडी मध्ये ठिकठिकाणी पेव्हींग ब्लॉक बसविण्याकामी ३५ लाख ६९ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

पवना नदीतील टाटा ब्रीज ते बोपखेल या क्षेञात असलेली जलपर्णी काढण्याकामी २५ लाख २० हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जंबो कोविड रुग्णालय उभारणीसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी तीन महीने कालावधीसाठी ५ कोटी ६६ लाख ४० हजार एवढा खर्च येणार आहे. त्यातील ३ कोटी ७७ लाख  ६० हजार इतक्या खर्चास स्थायी समिती सभा ठराव क्र.९१४० दि.३१.०३.२०२१ अन्वये मान्यता दिलेली होती. उर्वरीत १ कोटी ८८ लाख ८० हजार च्या खर्चास मान्यता देण्यात आली.

भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक किवळे बीआरटीएस कॉरिडॉरवरील शिंदे वस्ती येथे उड्डाणपुल बांधणेचे कामात अडथळा ठरणारा EHV,220 KV पयलोन शिफ्ट करणे या कामाचे सुपरविजन चार्जेस १ कोटी २१ लाख ८७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
सोनवणे वस्ती रामदासनगर परिसरातील जलनिःसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ३९ लाख ५० हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ११ मधील पवारवस्ती नेवाळेवस्ती मध्ये नाला ट्रेनिंग व स्टाँर्म वाँटर विषयक कामे करण्यासाठी ५८ लाख ४ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.१ चिखली मधील विविध डी.पी, रस्ते विकसीत करण्यासाठी १ कोटी ४७ लाख ३ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ९ कामगार नगर, खराळवाडी, भगवतगीता मंदीर परिसरा नुरमोहल्ला, कुलदीप आंगन परिसर मधील अंतर्गत रस्ते अद्यावत पध्दतीने करण्यासाठी ४२ लाख २५ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. ११ मधील उर्वरीत रस्त्याचे हाँटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी १ कोटी ११ लाख २३ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.१ मोरेवस्ती म्हेत्रेवस्ती परिसर रामदासनगर मधील रस्ते खडीमुरूम व डांबरीकरण करण्याकामी १ कोटी ५१ लाख १७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नव्याने विकसित होणा-या मुख्य चौकात नवीन  वाहतुक नियंत्रण  दिवे, ब्लिंकर बसविण्यासाठी  २५ लाख ५९ हजार  इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.७ भोसरी येथील सिताराम लोंढे उद्यानातील मनपाची भवानी तालीम व्यायामशाळेचे नुतनीकरण करण्याकामी आणि अनुषंगिक कामे करण्याकामी येणा-या ३ कोटी ३९ लाख १३ हजार इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र. ९ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात माता रमाई चौथरा बांधणे आणि इतर स्थापत्य विषयक कामे करण्याकामी ४२ लाख १८ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली तसेच माता रमाबाई पुतळा बसविणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी ७७ लाख ५६ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.३ मोशी परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकामी ४६ लाख १७ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.७ भोसरी येथे ठिकठिकाणी स्थापत्य विषयक आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी ४९ लाख ४० हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.५ मधील रस्त्यांचे हॉटमिक्स पध्दतीने डांबरीकरण करण्यासाठी येणा-या १ कोटी ४७ लाख तसेच प्रभाग क्र.७ भोसरी गव्हाणे वस्ती व इतर परिसरातील रस्त्यांचे  डांबरीकरण करण्याकामी येणा-या १ कोटी ४८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र.४ दिघी येथील स्मशानभुमीला सिमाभिंत बांधण्याकामी २ कोटी ६९ लाख ९१ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर मौजे रहाटणी येथील प्राधिकरणाच्या पेठ क्र.३८ औंध रावेत रस्त्यालगत  विरंगुळा केंद्र आणि अभ्यासिकासाठी फर्निचर करण्याकामी ५५ लाख ३३ हजार इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
दिघी व बोपखेल परिक्षेत्रातील पाण्याच्या टाकीचे परिचलन करणे व किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी ४८ लाख इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.
भोसरी पंपीग स्टेशन भोसरी गावठाण टाकी शांतीनगर आश्रमशाळा आणि संत तुकाराम नगर येथील जलक्षेत्रामध्ये दैनंदिन व्हॉल्व ऑपरेशन करण्याकामी ४८ लाख इतक्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago