Categories: Editor Choice

बोपखेल मनपा शाळेतील बाह्य लसीकरण व रोग प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करावे … भाग्योदय घुले यांनी वेधले लक्ष

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६जून) : पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल रामनगर-गणेशनगर भागात लहान मुले रोग प्रतिबंधक लसीपासून वंचित आहेत. पालिकेचे आरोग्य केंद्रच नसल्याने पालकांची तारांबळ होतं आहे. याकडे भाग्योदय घुले यांनी लक्ष वेधले.

भाग्यदेव घुले, “म्हणाले पिंपरी चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गाव बोपखेल (रामनगर गणेशनगर) भागात आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. साधे आरोग्य सुविधा केंद्रही परिसरात नाही. तज्ञांनी तिसऱ्या कोरोना लाटेचा अंदाज वर्तविला आहे. यात सर्वाधिक धोका लहान मुलांना आहे.  पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मुलांना साधे रोग प्रतिबंधक लसीकरणही होत नाही. फुकट असणाऱ्या डोससाठी खासगी रुग्णालयात पालकांना मोठी किंमत मोजावी लागते. अशाने गोरगरीब नागरिकांच्या हक्काच्या आरोग्याच्या अधिकाराचे हनन होत आहे. त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, पालिका आयुक्त राजेश पाटील यांना  निवेदनातुन विनंती करण्यात आली आहे

परिसरात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी. पर्यायाने दाट लोकसंख्या व आर्थिक दुर्बल लोक. येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे कामगार वस्तीतील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी पालिकेच्या सांगवी भोसरी रुग्णालयात जावे लागते. पालिकेची पर्यायी व्यवस्था नसल्याने अति गंभीर व तातडीच्या वेळी या रुग्णांची मोठी गैरसोय होते. गोरगरीब नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास आरोग्य सुविधांअभावी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बालकांना त्वरित डोस देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती आज पालिका आयुक्त राजेश पाटिल याना करण्यात आली.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

4 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

11 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

24 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

1 day ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

1 day ago