Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शिक्षण समिती सभापती पदाचा कार्यभार … भाजपच्या ‘माधवीताई राजापूरे’ यांच्याकडे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ नोव्हेंबर) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती, विधी समिती, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक या पाच विषय समितींच्या सभापतीपदाची निवडणूक आज (18 नोव्हेंबर 2021) रोजी महापालिका मुख्यालयाच्या तिस-या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात सकाळी 11 वाजता पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी कामकाज पाहिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपचे बलाबल असल्याने सर्वंच समित्यांमध्ये भाजपचेच सभापती होणार हे निश्चित होते, त्यानुसार आज आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या शिक्षण समिती सभापती- माधवी राजापुरे, महिला व बालकल्याण सविता खुळे यांची वर्णी लागली तर क्रीडा , कला व सांस्कृतिक समिती – उत्तम प्रकाश केंदळे, शहर सुधारणा समिती- अनुराधा गणपत गोरखे तर विधी समिती करीता स्वीनल कपिल म्हेत्रे यांचे एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची निवड करण्यात आली.

Google Ad

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्याची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे शेवटच्या दोन महिन्यासाठी सभापतीपदी वर्णी लागलेल्या या सभापतींना कामांसाठी कसरत करावी लागणार हे नक्की.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!