Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याकरीता … येत्या रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत पिंपरी चिंचवड मनपाची प्लॉगेथॉन मोहिम!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. १७ नोव्हेंबर २०२१) : पिंपरी चिंचवड शहराला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा आपला संकल्प असून या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे.  यासाठी महापालिकेने येत्या रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत प्लॉगेथॉन मोहिम आयोजित केली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

महापौर ढोरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने नागरिकरणाकडे वाटचाल करीत आहे.  त्यादृष्टीने महापालिकेने विकासाची कामेदेखील केली आहेत.  या शहराच्या गरजा ओळखून महापालिका नियोजन करीत आहे.  नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजना, प्रकल्प, उपक्रम आदी बाबी महत्वपूर्ण आहेत.  विकासाबरोबरच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महापालिकेने स्वच्छतेविषयक जनजागृती करीता २१ नोव्हेंबर २०२१ रोजी प्लॉगेथॉन मोहिम आयोजित केली  आहे.  शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था, बचत गट, हॉटेल असोसिएशन, कलाकार, पर्यावरणप्रेमी, खेळाडू, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्यासह नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.   शहरातील ३२ प्रभागातील ६४ ठिकाणी ही मोहिम राबविली जाणार आहे.  मोहिमे अंतर्गत प्लॅस्टीकसह कचरा गोळा केला जाणार आहे.  कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कच-यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्यात येणार असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

Google Ad

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, आपला परिसर स्वच्छ असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.  त्यामुळे स्वच्छतेचा आग्रह घरोघरी पोहोचविण्यासाठी महापालिकेने स्वच्छाग्रह मोहिम हाती घेतली आहे.  आपल्या शहराला स्वच्छ करुन सुंदर बनविण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला भरभरुन प्रतिसाद द्यावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!