Categories: Uncategorized

संविधान हे केवळ पुस्तक नाही तर देशाचा आत्मा – शंकर जगताप … सांगवीत संविधान दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२६ नोव्हेंबर – संविधानाने आपल्या देशातील लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे. संविधान हे पुस्तक नाही तर देशाचा आत्मा आहे, असे मत नवनिर्वाचित आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

सांगवी येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. या संविधानातील प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करत सर्वांनी संविधानाचे पालन करण्याची शपथ घेतली. त्यावेळी संविधान मस्तकाला लावून जगताप यांनी अभिवादन केले.

कार्यक्रमास ,माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, प्रशांत शितोळे,  शारदा सोनवणे, सुषमा तनपुरे,  दिलीप तनपुरे, सागर अंगोळकर, दत्तात्रय यनपुरे, कांता भाऊ कांबळे,  उज्वला ढोरे,  सोनाली जम, जवाहर ढोरे, संतोष ढोरे, तृप्ती कांबळे, सीमा पाटोळे, सुरेश ढमाले, श्याम ढोरे, प्रीतम बालवडकर, अमोल गायकवाड, शाहरुख सय्यद, संदीप तांबे, निमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, आपले संविधान हीच आपल्या लोकशाहीची ओळख आहे. या संविधानामुळेच देशात लोकांचे, लोकांनी व लोकांसाठी चालविलेली राज्य व्यवस्था अस्तित्वात आली आणि गेल्या ७५ वर्षांत ती चांगली रुजली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनतीने आणि दूरदृष्टीने आपले संविधान तयार केले. हे संविधान आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांसारख्या मूल्यांवर आधारलेले एक समान व सुदृढ समाज निर्माण करण्याचा मार्ग दाखवते.

आपल्या संविधानाने आपल्या देशाला लोकशाहीचा पाया दिला आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आपले स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार आहे, आणि प्रत्येक व्यक्तीला समानतेचा हक्क आहे, असे जगताप म्हणाले.

आजच्या दिवशी आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह ज्यांनी आपले संविधान तयार करण्यासाठी अथक प्रयत्न केले त्या सर्वांना आदरांजली वाहतो. आपल्याला संविधानाने दिलेली ही जबाबदारी आणि हक्क जपण्याची, देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची शपथ घेऊया, असे आवाहन आमदार जगताप यांनी या प्रसंगी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या रुग्णांची पुण्यात शंभरी पार, कोणत्या रुग्णालयात किती रुग्ण?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२८ जानेवारी : राज्यात 'गुइलेन बॅरे सिंड्रोम'चं थैमान वाढत असल्याचं पाहायला मिळत…

1 week ago

पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर, नव्या सुनावणीची नवी तारीख, कोर्टात काय घडलं?

महाराष्ट्र 14 न्यून, दि. २८ जानेवारी : ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची…

1 week ago

नवी सांगवी च्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल’ मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक -26 जानेवारी 2025) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित,…

1 week ago

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन …. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा उपक्रम

व्हीजन@५० शहर धोरण उपक्रमासाठी अधिकारी, कर्मचारी आणि भागधारकांसमवेत गटचर्चेचे आयोजन  - *पहिल्या दिवशी महापालिका अधिकारी…

2 weeks ago