महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ नोव्हेंबर) : दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसनिमित्त श्री गजानन महाराज मंदिरासमोर सांगवी येथे शेतकऱ्याची कामधेनू गायी आणि वासराचे सामूहिक गोमाता पूजन कार्यक्रमाचे आयोजन सक्सेस ग्रुप व सुनेत्रा महिला प्रतिष्ठाण यांच्या वतीने दिपावली वसुबारस निमित्त २८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
यावेळी मा. महापौर उषा ढोरे, नगरसेवक संतोष काबंळे, शुभांगी शंकर जगताप, सोनल जगताप, कावेरी जगताप, शारदा सोनवणे, अनुश्री हर्शल ढोरे, तृप्ति संतोष कांबळे, पल्लवी महेश जगताप, संजय जगताप, विरेंन शंकर जगताप, संतोष ढोरे, गणेश ढोरे, वैभव ढोरे, सुषमा तनपुरे, संगीता ठाकर, शीतल थोपटे, संगीता दीक्षित, शोभा चौधरी, उज्ज्वला ढोरे, ढमाले वहिनी, सारिका भंडलकर, संगीता प्रधान, साहेबराव पथाडे गजानन मंदिर समोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गजानन मंदिर सर्व ट्रस्ट चे सचांलक सांगवीतील हज़ारों महिला भगिनींनी यावेळी गाय वासराचे पूजन केले सौ मंदाकिनी दिलीप तनपुरे यांच्या वतीने सर्व महिलांना दीपावलीच्या पणती भेट देन्यात आल्या, चंद्रशेखर ईमानदार काका यांनी मंत्र महनून श्री व सौ तनपुरे आणि श्री व सौ कांबळे यांच्या शुभहस्ते पूजन करुण कार्यक्रमास सुरुवात केली.
भारतीय संस्कृतीत गायीला महत्त्व असल्याने गाय आणि वासराचे पूजन करून वसुबारस साजरा केला जातो. त्यानुसार जुनी सांगवी येथील सक्सेस ग्रुप आणि सुनेत्रा महिला प्रतिष्ठानच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरासमोर दिलीप तनपुरे व सौ. मंदाकिनी तनपुरे आणि मित्र परिवाराच्या वतीने वसुबारसनिमित्त सामूहिक गोमाता पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याठिकाणी गाय आणि वासराचे पूजन सर्व महिलांच्या हस्ते पूजन करून वसुबारस साजरी केली, यावेळी परिसरातील महिला भगिनी, नागरीक बांधव यांनी भाग घेऊन दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत केला.
दिवाळीची खरी सुरुवात वसुबारस पासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. यंदा २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस सण साजरा केला. या दिवशी गाईची पूजा करण्यात आली, दिवाळीची चाहूल जवळ आल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसत होते. गाय ही शेतकऱ्याची कामधेनू असल्याने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसनिमित्त तिची यथासांग पूजा केली गेली.
दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारसपासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान, पूजा करण्यासाठी ओळखला जातो. ‘वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’ म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…