महाराष्ट्र 14 न्यूज, दि..04 ऑगस्ट :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याची जागेवरच सोडवणूक करण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ या जनसंपर्क उपक्रमांतर्गत ‘आमदार शंकर जगताप’ यांनी वाकड , राहटणी – काळेवाडी परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधला. यादरम्यान परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या, सर्वसामान्यांनी मांडलेल्या समस्या आत्मीयतेने ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचनाही शंकर जगताप यांनी यावेळी दिल्या आणि या कार्यक्रमाचे शहरातील नागरिकांनी भरभरून कौतुकही केले.
झपाट्याने विकसित होणार पिंपरी चिंचवड शहर त्या विकासाबरोबर लोकसंख्या ही तितकीच झपाट्याने वाढली यात सर्वसामान्य माणसाला लागणाऱ्या मूलभूत गरजांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी नागरिकांना प्रशासनाचे दरवाजे झिजवावे लागतात, त्यांची हीच अडचण ओळखून ‘आमदार शंकर जगताप’ यांनी जनतेसाठी पिंपरी चिंचवड शहरात सर्वप्रथम सर्व प्रशासनच एक ठिकाणी आणले आणि ‘आमदार आपल्या दारी’ या त्यांच्या महत्वकांक्षी योजनेतून त्या समस्यांचा जागेवरच निपटारा केला.
त्यांनी हा उपक्रम आपल्या मतदारसंघात अनेक ठिकाणी घेतला, असाच उपक्रम गुरुवार दि. ०७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० वा.
मल्हार गार्डन, नवी सांगवी येथे आयोजित करण्यात आला आहे.
यात
प्रभाग क्रमांक ३१ व ३२ मधील नागरिकांकरिता
▶️शासकीय योजना,
▶️जनसामान्यांच्या तक्रारी,
▶️शासकीय दाखले,
▶️महापालिकेशी संबंधित तक्रारी,
▶️रेशनकार्ड,
▶️- वीज, पाणी, ड्रेनेज समस्या
या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेचे सर्व अधिकारी, शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नागरिकांनी आपले अर्ज तसेच आपल्या तक्रारींविषयी योग्य त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार शंकर जगताप यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…
महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…