महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.- ०४ मार्च २०२३) :- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सोशल आवरनेस ऍण्ड ऍक्शन्स टु न्युट्रलाईझ न्युमोनिया
(SAANS), चाईल्ड डेथ रिव्हु (CDR) व कॅपॅसिटी बिल्डींग (RNTCP) अंतर्गत एक दिवसीय वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण दि.०४/०३/२०२३ रोजी चिंचवड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. सदर प्रशिक्षणाचा दि.०४/०३/२०२३ रोजी सकाळी-१०.०० वाजता उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला.
सदर प्रशिक्षणास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, डॉ.अभयचंद्र दादेवार, इंडियन मेडिकल असोशिएशन अध्यक्ष डॉ.दिलिप कामत, बालरोगतज्ञ डॉ.राजेंद्र करंबळेकर, राज्य क्षयरोग सल्लागार डॉ.राजाभाऊ येवले, CME निरिक्षक डॉ.घोरपडे, वैद्यकीय उप अधिक्षक डॉ.मनिषा क्षिरसागर, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ.बाळासाहेब होडगर, डॉ.राजेंद्र फिरके, डॉ.संगिता तिरुमणी, डॉ.सुनिता साळवे, डॉ.रविंद्र मडपे, डॉ.तृप्ती सागळे, डॉ.शैलजा भावसार, डॉ.ऋतुजा लोखंडे, डॉ.सुनिता इंजिनियर, वैद्यकीय अधिकारी, डॉ.विजया आंबेडकर, डॉ.अंजली ढोणे, डॉ.श्रीकांत सुपेकर, डॉ.कल्पना गडलिंकर, डॉ.चैताली इंगळे व मनपाचे ७० वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणामध्ये डॉ.राजाभाऊ येवले यांनी क्षयरोगाबाबत तर डॉ.राजेंद्र करंबळेकर व डॉ.वर्षा डांगे यांनी न्युमोनिया या विषयावर तसेच डॉ.श्रीकांत सुपेकर यांनी बालमृत्यु विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ.पवन साळवे यांनी क्षयरोग, न्युमोनिया व बालमृत्यु नियंत्रणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात येणा-या विविध उपाययोजना, नियोजन व शासनास सादर करावयाच्या अहवालाबाबत माहिती दिली. सदर प्रशिक्षणासाठीचे सुत्रसंचालन डॉ. वर्षा डांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विजया आंबेडकर यांनी मानले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप - शिवसेना -…