महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता अभियान उपक्रम श्री कल्पतरू बहुउद्देशिय संस्थेच्या संचालिका सौ संजीवनी माधव मुळे यांनी दि.०५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने “श्रद्धा गार्डन’ गावडे पार्क चिंचवड येथे स्वच्छता अभियान प्लॅस्टिक मुक्ती हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात “स्पंदन “महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. मनिषा अविनाश इंगवले ECA च्या कार्यकर्त्या अनघा दिवाकर, लसेच R.R.R. ची टीम, स्थानिक महिला व पुरुष तसेच संस्कार वर्गातील विद्यार्थी यांनी सहभाग होवून गल्लीतील प्लॅस्टिक जमा केले.
गल्ली साफ केली. हया कार्यक्रमाची सुरवात “माझी वसुंधरा शपथ मी भारताचा सुजान नागरिक शपथ “घेतो कि, मी या भारत मातेला, वसुंधरेला स्वच्छ व सुंदर शपथ ठेवण्यासाठी प्रयत्न करीन” या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्या पासून कोणतीही हानी होणार होणार नाही याची दक्षता घेईन मी या देशाला “सुजलाम सुफलाम” करण्यासाठी कटीबद्ध राहिल व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला व वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हारित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन.
प्राणी आणि मानव यांच्यातील फरक म्हणजे प्राणी पर्यावरणासाठी स्वतःला बदलतात, परंतु मानव स्वतः साठी पर्यावरण बदलतात, पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली आते म्हणूनच दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत हानीकारक याची जाणीव सर्वांना असून त्याचा वापर थांबविण्यासाठी वर आपण भर दिला पाहिजे असे प्रतिपादन संजीवनी मुळे यांनी केले. यंदाची थीमही यावर अधारित असून ‘बीट प्लॉस्टिक पॉल्यूशन असे नाव देण्या आले. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य माधव मुळे, पवन कांबळे, अनघा दिवाकर, मनिषा इंगवले तसेच संस्कार वर्गातील रोहन खरात यांनी मोलाचे सहकार्य केले.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 26 जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते,…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८ जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…