महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जून) : महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी वारीला आजपासून टाळ आणि मृदंगाच्या गजरात सुरुवात होणार झाली. देहू-आळंदीत राज्याच्या कोनाकोपऱ्यातून दिंड्या दाखल झाल्या आहेत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखीने शनिवारी दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
देहूत सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झाला आहे. देहू शहरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत असल्याने त्यासाठी देहू नगरीत शेकडो वारकरी दाखल झाले आहे. जय हरी विठ्ठलाचा गजर करत वैष्णवाचा मेळा भरला आहे. दरवर्षी वारकरी या दिवसाची वाट बघत असतात. आज हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार असल्यानं आणि वारीत सहभागी होणार असल्यानं वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे.
पिंपरी चिंचवड येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट – लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने वारकऱ्यांकरिता मोफत आरोग्य सेवा या वारी काळात पुरविण्यात येणार आहे, त्याचा प्रारंभ देहू येथून करण्यात आला. यावेळी ह देहू संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, ह.भ.प. डॉ पंकज महाराज गावडे, विजयशेठ जगताप , सुभाष दादा काटे, ह भ प पायगुडे महाराज, बाळासाहेब काशिद महाराज, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शंकर जगताप, ऐश्वर्या रेणुस, शिवानी सावंत, अदित्य जगताप, गणेश सोनवणे, विराज रेणुस, राजू नागणे, अलका झेंडे, कुंदा रेणूसे, सविता साखरे, भाऊसाहेब जाधव, रमेश काशिद, उद्धव कवडे, गणेश गावडे, सखाराम रेडेकर, सुरेश शिंदे, गणेश झेंडे, साई कोंढरे, ललित म्हसेकर उपस्थित होते.
पुणे ते पंढरपूर संपूर्ण पालखी महामार्गावर वारकरी बांधवांना चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट – लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप मित्र परिवार यांच्या वतीने ही आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांची टीम असून हे सर्व डॉक्टर पुणे ते पंढरपूर पालखी मुक्कामी वारकऱ्यांना सर्व प्रकारची आरोग्य सेवा आणि औषधे संपूर्णपणे मोफत पुरवणार आहे.
आज देहू येथून पालखी प्रस्थानाकरिता आलेल्या हजारो वारकऱ्यांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतल्याचे पहायला मिळाले.यात जेष्ठ वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यामध्ये वारकऱ्यांना सर्व प्रकारची औषधे ट्रस्ट च्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात आली. यात डॉ संतोष कदम, डॉ गणेश अंबिके, डॉ सारंग शेलार, डॉ आरती जोशी, डॉ प्रियांका बाजड डॉ देविदास शेलार तसेच चंद्ररंग पॅरामेडीकलच्या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…
महाराष्ट्र14 न्यूज, दि.०५ देचेमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ…